Onion Price । निर्यातबंदी संपून १२ दिवस उलटले तरी महाराष्ट्रातील कांद्याच्या दरात कोणतीही सुधारणा झालेली नाही. सोलापूरपाठोपाठ आता राहुरी मंडईत कांद्याचा किमान भाव केवळ 100 रुपये प्रतिक्विंटल राहिला आहे. सोलापुरात शेतकऱ्यांना सातत्याने किमान 100 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. आता राहुरीमध्ये देखील 100 रुपये प्रतिक्विंटल कांद्याला भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
Onion Rate । निर्यातबंदी उठताच दिल्लीत कांदा महागला, किलोमागे एवढा भाव वाढला
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की जोपर्यंत सरकारने किमान निर्यात किंमत $550 प्रति टन आणि त्यावर लादलेले 40 टक्के शुल्क काढून टाकले नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना निर्यात खुली करण्याचा कोणताही फायदा मिळणार नाही. कारण निर्यात सुरू करूनही कांदा महागल्याने निर्यात होत नाही. त्यामुळे राज्यातील मंडईंमध्ये कांद्याची आवक वाढली असून, त्यामुळे भाव गडगडले आहेत. खरीपानंतर रब्बी हंगामातही चांगला भाव मिळत नसल्याने भविष्यात शेती कशी करणार, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
Kalingad Rate । अमेरिकेत कलिंगड विकत घेण्यासाठी किती पैसे लागतात? किंमत वाचून बसेल धक्का
निर्यातबंदी संपुष्टात आल्यावर राज्यातील कोणत्याही बाजारपेठेत एकाही शेतकऱ्याला 1 ते 2 रुपये किलो दराने कांदा विकावा लागणार नाही, अशी आशा शेतकऱ्यांना होती, मात्र तशी परिस्थिती निर्माण झाली नाही. सरकारने ४ मे रोजी निर्यातबंदी संपवली. त्यानंतर 5 आणि 6 मे रोजी भाव वाढले होते पण त्यानंतर ते पुन्हा पूर्वीप्रमाणेच घसरले.
Fennel Cultivation । शेतकऱ्याची बातच न्यारी! पहिल्यांदाच श्रीगोंदा दरवळला बडीशेपच्या सुगंधानं
कांद्याची महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०२३ रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यापूर्वी, किंमत नियंत्रित करण्यासाठी प्रति टन $800 ची MEP लागू करण्यात आली होती. त्याआधीही ऑगस्ट २०२३ मध्ये ४० टक्के निर्यात शुल्क लावण्यात आले होते.