Onion Market । सध्या कांद्याच्या प्रश्नावर नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी लिलाव बंदचा निर्णय घेतला असून आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. यामध्ये पालकमंत्री दादा भुसे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रश्न सुटले नाहीत त्यामुळे व्यापारी आपल्या मागणीवर ठाम आहेत.
दरम्यान, आज येवल्यात दुपारी ३ वाजता व्यापाऱ्यांची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वच शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
नाफेड व एनसीसीएफ मार्फत केंद्र सरकारने कांदा खरेदी केला. कांद्यावर 40% निर्यात शुल्क लागू केले. एक टक्का बाजार फी, अर्धा टक्का केली नाही. देशातील विक्रेत्यांकडून चार टक्के आडत देखील घेतली जात नाही. त्याचबरोबर नाफेड आणि एनसीसीएफने देशांतर्गत बाजारात कांद्याची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे कांद्याचे दर पडले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही होत आहे. त्यामुळे जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत व्यापारी आंदोलनावर ठाम राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस न आणल्याने बाजारामध्ये देखील शुकशुकाट पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी संपर्क साधला. यावेळी अब्दुल सत्तार यांनी लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या 26 तारखेला याबाबत बैठक घेण्याचे ठरले होते. मात्र लिलाव बंद ठेवल्याने व्यापाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे आदेश अब्दुल सत्तार यांनी दिले आहे.
Havaman Andaj । पुढील 24 तासांत ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा हवामान विभागाचा ताजा अंदाज