Onion Export

Onion Export । ब्रेकिंग! दोनच दिवसात घेणार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय, कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

बातम्या

Onion Export । केंद्र सरकारकडून (Central government) स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी कांद्यावर निर्यात बंदी (Export Ban on Onion) घालण्यात आली आहे. परंतु सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. कांद्याची निर्यात बंदी (Onion Export Ban) 31 मार्च 2024 पर्यंत कायम राहणार आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात आता शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झाले आहेत.

Milk Rate Issue । धक्कादायक! मंत्र्यांनीच केली दूध उत्पादकांची बदनामी

सरकारच्या निर्णयामुळे अवघ्या एका दिवसात कांद्याच्या दरात दोन हजार रुपये प्रति क्विंटलने घसरण (Onion price falls down) झाली आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात चाळीस टक्के कांदा निर्यात शुल्क आणि नोव्हेंबर महिन्यात आठशे डॉलर किमान निर्यात मूल्य लागू केल्याने चार, साडेचार महिन्यांपासून केंद्राने कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवले आहेत. शिवाय नाफेड आणि एनसीसीफने घेतलेला बफर स्टॉकमधील (Buffer stock) कांदा देशातील विविध बाजारामध्ये स्वस्तात विक्री करून कांद्याचे दर (Onion rates) पडले आहेत.

Pest control । गोचीड नियंत्रणाविषयी महत्वाची माहिती

शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेतला जाणार

या निर्णयामुळे महायुतीला मोठ्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यावर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करत आहे. येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेतला जाणार आहे,” असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

Causes and remedies for animal clogging । जनावरांचा जार अडकण्याची कारणे व उपाय

आठवड्याभरात मिळणार अग्रीमची रक्कम

कृषिमंत्र्यांच्या आश्वासनामुळे आता केंद्राच्या निर्णयाकडे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा लक्ष लागले आहे. तसेच दुष्काळ, अतिवृष्टी आणि गारपिटीने राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेतला जाणार असून ज्या शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा मिळाला नाही, त्यांच्या खात्यात आठवड्याभरात अग्रीमची रक्कम जमा केली जाणार आहे, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

Signs of identifying mange in animals । जनावरांतील माज ओळखण्याची लक्षणे कोणती? पशुपालकांनो वाचा फायद्याची माहिती

सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांद्याच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली आहे. केंद्र सरकार लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेणार आहे, असे पियुष गोयल यांनी आश्वासन दिले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बैठकीची माहिती दिली आहे.

Jowar Bajar Bhav । ज्वारीचे भाव कडाडले! ‘या’ ठिकाणी मिळाला सर्वाधिक दर, जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *