Onion Crop

Onion Crop । भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल तर कांद्याच्या ‘या’ जातीची करा लागवड, प्रति हेक्टरी निघेल ५०० क्विंटलपर्यंत उत्पादन

बातम्या

Onion Crop । भारतात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात शेतकरी कांद्याची लागवड करतात. मात्र शेतकऱ्यांना कांद्याची लागवड करताना योग्य वाणाची निवड करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळी योग्य वाण निवडले तर शेतकरी कांद्याची उत्तम लागवड करू शकतात. बाजारात कांद्याचे अनेक वाण उपलब्ध आहेत. आज आपण बफर उत्पादन देणार्‍या 5 जातींबद्दल माहिती पाहणार आहोत त्यामधून तुम्हाला जास्त उत्पन्न मिळेल. (Onion Crop)

कांद्याच्या सुधारित जाती

१) पुसा लाल

पुसा लाल या जातीचा कांदा लाल रंगाचा असतो. यामध्ये एका हेक्टरमध्ये किमान 200 ते 300 क्विंटल उत्पादन घेता येते आणि साठवणुकीसाठी विशेष जागेची आवश्यकता नसते. एका कांद्याचे वजन 70 ते 80 ग्रॅम असते. हे पीक तयार होण्यासाठी १२०-१२५ दिवस लागतात. त्यामुळे तुम्ही जर याची लागवड केली तर यामधून चांगले उत्पादन मिळेल.

२) पुसा रत्नार

या जातीच्या कांद्याचा आकार किंचित सपाट व गोल असतो, तर त्याचा रंग गडद लाल असतो आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 400 ते 500 क्विंटल कांदा मिळू शकतो. हे पीक १२५ दिवसांत तयार होते. याची लागवड केल्यास देखील तुम्हाला चांगला फायदा होईल.

३) हिस्सार-2

या जातीचा कांदा देखील गडद लाल आणि तपकिरी रंगाचा असतो. या कांद्याची लागवड केल्यानंतर १७५ दिवसांनी पीक पक्व होते. त्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याची चव तिखट नसते. यापासून हेक्टरी 300 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.

४) पुसा पांढरा कांदा

अनेकवेळा आपण बाजारात पांढर्‍या रंगाचे कांदे देखील पाहतो. कांद्याची ही जात लागवडीनंतर १२५ ते १३० दिवसांनी तयार होते. साठवण क्षमता चांगली आहे. त्याचे हेक्टरी उत्पादन ३२५ ते ३५० क्विंटल असू शकते. महत्वाची गोष्ट म्हणजे पांढऱ्या कांद्याला बाजारामध्ये मोठी मागणी असते. त्यामुळे तुम्ही यातून चांगले पैसे कमावू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *