Navratri 2023

Navratri 2023 । काय आहे शेतीच्या दृष्टीनं घटस्थापनेचं महत्व? जाणून घ्या

बातम्या

Navratri 2023 । गणेशोत्सवानंतर सर्वांना आतुरता असते ती म्हणजे नवरात्रीचे. संपूर्ण देशामध्ये शारदीय नवरात्रौत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करतात. या नवरात्रीच्या दिवसांत देवीच्या ९ रूपांची भक्तीभावाने पूजा करतात. घरोघरी घटस्थापना करण्यात येते. या कालावधीत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या नऊ दिवसांत देवी पृथ्वीवर अवतरून आपल्या भक्तांची दुःख दूर करते, अशी श्रद्धा आहे.

Snakes Farming । ऐकावं ते नवलच भाऊ! येथे सापाचीही करतात शेती, कसं असतं नियोजन? जाणून घ्या

आजही आपल्याला वर्षानुवर्षे चालत आलेली घटस्थापनेची (Ghatsthapana) परंपरा पाहायला मिळते. घटस्थापना करत असताना सर्वात अगोदर एक पळसाच्या पानाची पत्रावळी ठेवून त्यावर शेतातील काळी माती ठेऊन यात वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे मिसळतात. त्यात पुन्हा एक कच्च्या मातीचा घट ठेवण्यात येतो. या घटामध्ये नऊ दिवस रोज नित्य नियमाने पाणी घातले जाते. शेवटच्या नवव्या दिवशी तळी उचलून याचे विसर्जन करतात. पण तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का? की घट मातीचा का असतो?

Pumpkin Farming । बापरे! पाच फुटांचा भोपळा, अशाप्रकारे करा लागवड; मिळेल भरघोस नफा

नवधान्यांची पेरणी करून त्यावर रोज थोडे पाणी शिंपडल्याने त्याला कोंब फुटतात. हे कोंब म्हणजे भविष्यातील भरघोस कृषीचे-उत्पन्नाचे हे सूचक असते. नऊ दिवस या घटावर रोज एक एक माळ-नवदुर्गासाठी सोडायची हा या नवरात्राचा शुभारंभ आहे. रब्बी हंगामात जे पीक शेतात घेतले जाते तेच बियाणे या घटात टाकले जाते. महत्त्वाचे म्हणजे नऊ दिवसांच्या परीक्षणानंतर घटात ज्या पिकाची उगवण क्षमता सर्वात जास्त असते केवळ तेच पीक शेतकरी आपल्या शेतात घेतात.

Success Story । डाळिंबाच्या शेतीने शेतकऱ्याचे नशीबच बदलले; काही वेळातच झाला मालामाल; जाणून घ्या कसं केलं नियोजन?

आपल्याच शेतातील माती का वापरतात?

घट स्थापनेसाठी काळी माती वापरतात. ही माती इतर कोणाच्या शेतातील घेत नाही. शेतकरी ज्या शेतात तो पिक घेणार आहे त्या शेतातील मातीचे हे परिक्षण यावेळी केले जाते. शेतात वापरले जाणाऱ्या बियाणांची उगवण क्षमता पाहिली जाते.

Egg Production । गावरान अंड्याच्या उत्पादनातून दुर्गम गावांना मिळाले आर्थिक बळ, लोक घेतायेत हजारोंचे उत्पन्न

वापरण्यात येणारे जलस्त्रोत्र

शेतकरी त्याच्या शेतासाठी ज्या जलस्त्रोत्राचे पाणी वापरतो त्याच जलस्त्रोत्राचे पाणी घटात घालतात.. घट हा मातीचा आणि कच्चा भाजलेला असतो.कारण घटामध्ये ओतलेले पाणी सतत पाझरणे गरजेचे असते. यामुळे त्याच्या खाली शंकू आकारात ठेवलेल्या बियांना रुजण्यासाठी त्याची उपलब्धता होते.

Success story । हॉटेल व्यावसायिकाने घेतला शेती करण्याचा निणर्य! झेंडूची लागवड केली, कमावतोय लाखो रुपये; कस केलं नियोजन?

मातीच्या घटामागचे रहस्य

  • हा घट मातीपासून तयार केलेला असतो. कारण या मातीच्या घटात ओतलेले पाणी पाझरते.
  • हे पाणी माती आणि बियाणासाठी पोषक असून रपून येणाऱ्या पाण्यावर बियाणे उगवतात.
  • नऊ दिवसानंतर जे पीक चांगले आले आहे ते पीक शेतकरी शेतात पेरतो.
  • त्यामुळे जरी शहरी भागात घटस्थापनेला धार्मिकतेची जोड असली तरी ग्रामीण भागात यामागे एक अनोखं तंत्र लपलं आहे.

Guava Rates । डाळिंबानंतर पेरुला आले अच्छे दिन, किलोला मिळाला ‘इतका’ दर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *