Nashik Onion

Nashik Onion । मोठी बातमी! अखेर पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने कांदा व्यापाऱ्यांकडून संप मागे

बाजारभाव बातम्या

Nashik Onion । नाशिक : राज्यात मागील १३ दिवसांपासून कांदा व्यापाऱ्यांचा संप सुरु होता. जोपर्यंत केंद्र आणि राज्य सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत लिलाव सुरु होऊ देणार नाही, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला होता. आता हा संप मागे घेण्यात आला आहे. सोमवारी कांदा व्यापाऱ्यांची पालकमंत्री दादा भुसे यांनी एक बैठक घेतली. यावेळी व्यापाऱ्यांनी बिनशर्त संप मागे घेतला.

Banana Crop Insurance । केळी विमा प्रश्न तापला; आंदोलन होणार…

बुधवारपासून लिलाव सुरु होऊ शकतात. परंतु एक महिन्याच्या आत केंद्र आणि राज्य सरकारने आमच्या अडचणी सोडवाव्यात, असाही इशारा कांदा व्यापाऱ्यांकडून देण्यात आला आहे. बैठकीनंतर दादा भुसे यांनी येत्या 13 दिवसांत व्यापाऱ्यांवर बाजार समितीने केलेल्या कारवाया मागे घेतल्या जातील,अशी घोषणा केली. जिल्हा उपनिबंधक सकारात्मक निर्णय घेतील, असे दादा भुसे यांनी स्पष्ट केले.

Raju Shetti । साखरेचे एकही पोते कारखान्याबाहेर जाऊ देणार नाही; राजू शेट्टी यांचा गंभीर इशारा

दरम्यान, कांदा निर्यातीवरील ४० टक्के शुल्क मागे घेण्यासह इतर मागण्यांसाठी२० सप्टेंबरपासून जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवले होते. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले होते. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेतली होती. परंतु व्यापाऱ्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी संप मागे घेतला नाही. व्यापाऱ्यांवर दबाव वाढत असल्याने त्यांनी दादा भुसे यांच्याशी चर्चा केली.

Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील 48 तासांसाठी राज्याच्या ‘या’ ठिकाणी ‘मौसम मस्ताना’; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *