Narendra Modi | शेतमालास किमान आधारभूत किंमत (Minimum Support Price for Agriculture) मिळावी या मागणीसाठी पंजाब आणि हरियाणा शेतकरी दिल्लीत आंदोलन (Farmer strike) करत आहे. पण या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करताना दिसत आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. शिवाय या आंदोलनाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी देखील पाठिंबा दिला आहे. शेतकरी आंदोलनावरून खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जहरी टीका केली आहे.
सरकार शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याच्या तयारीत
“शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सशस्त्र सेना तैनात केली आहे. पण शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. तर दुसरीकडे शेतकरी पुढे गेले तर त्यांच्यावर गोळ्या झाडण्याची मोदी सरकारची (Modi Govt) तयारी आहे, अशी माझ्याकडे गुप्त माहिती आहे. अदाणीला देण्यासाठी लाखो हजारो कोटींचे व्यवहार होत असून शेतकऱ्यांसाठी सव्वादोन कोटी लाख लागत असल्याने त्याची कुठलीही तरतूद करण्यास सरकार तयार नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला. (Sanjay Raut vs Government)
Tur Market । तुरीला सध्या किती बाजारभाव मिळतोय? शेतकरी मित्रांनो वाचा एका क्लिकवर
“तुम्ही स्वामीनाथन यांना भारतरत्न देता, ज्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमाला संदर्भात काही सूचना केल्या, त्यात शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा अशी देखील मागणी होती. हेच सरकार 2014 पासून सांगत आहे की शेतकऱ्यांचा रोजगार दुप्पट करण्यात येईल. सध्या त्यांना रोजगार सिंगल सुद्धा मिळत नाही, महाराष्ट्राची स्थिती पाहता पिकविमा योजनेचा बोजवारा उडाला आहे. सगळे राजकारणात अडकले आहेत,” असा दावा राऊत यांनी केला आहे.
पुढे राऊत म्हणाले की, महाराष्ट्र आणि पंजाब हे कृषिप्रधान राज्य आहेत. कांदा निर्यात करून महाराष्ट्रात शेतकऱ्यांची दिशाभूल सुरू असून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्यांनी पाठिंबा द्यावा, यासाठी आपण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी बोललो आहे. उद्या सकाळी उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत. लवकरच उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील,” असे राऊत म्हणाले आहेत.
Success Story । काय सांगता! लसणाच्या शेतीतून शेतकरी बनला करोडपती, कसं केलं नियोजन