Namo Shetkari Mahasanman Yojana

Narendra Modi | सरकाकडून शेतकऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट! नमो शेतकरी महासन्मान योजनेचे जमा होणार पैसे

शासकीय योजना

Narendra Modi | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शिर्डीमध्ये (Shirdi) नमो शेतकरी महासन्मान योजनेचा शुभारंभ होणार आहे. महाराष्ट्रातील ८६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आज पहिला हप्ता देखील जमा होणार आहे. यासाठी सरकारकडून 1 हजार 720 कोटींचा निधी उपलब्ध केला गेला आहे. यामुळे यंदा सरकारकडून दिवाळीआधीच शेतकऱ्यांना गिफ्ट मिळाल्याचे म्हंटले जात आहे.

Pomegranate Insurance | डाळिंबांच्या बागांनाही मिळते विमा संरक्षण; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?

नमो शेतकरी महासन्मान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात राज्यसरकारकडून प्रतिवर्षी सहा हजार रुपये जमा होणार आहेत. आनंदाची बाब म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मिळून राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये मिळणार आहेत. (Namo Shetkari Mahasanman Yojana)

Sarkari Yojna । आनंदाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार विविध सोयीसुविधांचा लाभ; लवकर करा अर्ज

प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत (PM Kisan) पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत कृषी विभागाने विशेष मोहीम हाती घेत 9 लाख 58 हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी, 2 लाख 58 हजार शेतकऱ्यांचे खाते आधार संलग्न, 1 लाख 29 हजार शेतकऱ्यांच्या भूमिअभिलेख नोंदी अशा एकूण 13 लाख 45 हजार शेतकऱ्यांच्या अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण केले आहे.

Maharashtra Drought | मोठी बातमी! राज्यसरकार लवकरच दुष्काळ जाहीर करणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ‘या’ सवलती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *