Nandurbar News । मनात जर इच्छा असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्ही कोणतेही काम करू शकता. आज अनेकजण जिद्दीच्या जोरावर आपले स्वप्न पूर्ण करत आहेत. समाजात अशी कित्येक लोक आहेत जे अपंग असूनही आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. वाचून तुम्हालाही धक्का बसला असेल ना. होय, सातपुड्यातील (Saatpuda) दोन्ही पायांनी अपंग असलेले बंधू (Disabled brother) आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
पोटासाठी तोंडात कोयता धरून ऊसतोडणी
ही संघर्ष गाथा आहे, सातपुड्यातील बिलगाव (Bilgaon) येथील. या गावात रोजगाराच्या कोणत्याही संधी आहेत ना कोणत्या शासकीय योजना आहेत. दोन्ही पायांनी अपंग असलेले हे बंधू (Handicap Brother) उसाची तोडणी करतात. घरातील दोन्ही कर्ते पुरुष दोन्ही पायांनी अपंग आहेत, त्यामुळे त्यांनी आपल्या दुःखाचा गाजावाजा न करता सरळ तोंडात कोयता धरून ऊसतोडणी (Sugarcane cutting) सुरु केली.
या दोन्ही बंधूंसोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्य असतात. यामध्ये त्यांची मुलं काम करतात. परिस्थिती बिकट असल्याने त्यांना त्यांच्या मुलांना शिक्षण देखील चांगले देता येत नाही. जिल्ह्यातील राजकीय नेते ही दिव्यांग व्यक्तींकडे (Persons with disabilities) लक्ष देत नसतील तर आदिवासी समाजातील राजकीय नेते काय कामाचे? असा संतप्त सवाल मल्लेश जयस्वाल यांनी उपस्थित केला आहे.
योजनांपासून अपंग व्यक्ती वंचित
सरकारने विविध योजना सुरु केल्या आहेत. विशेष म्हणजे अपंगांसाठी देखील विविध योजना सुरु केल्या आहेत. परंतु, हे दोन बंधु सरकारच्या या योजनांपासून वंचित आहेत. सरकारी योजना सुरु करूनही सातपुड्यातील दुर्गम भागातील लोकांना पोटाची खळगी भरण्यासाठी अपार कष्ट करावे लागत आहे. सर्वेक्षण करूनही हे दोन बंधू योजनांपासून वंचित कसे असा सवाल साहजिकच उपस्थित केला जात आहे.
मुलाला शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको ग बाई, वावरातल्या कारभाऱ्याला मिळेना कारभारीण
सरकारने मोठा गाजावाजा करून दिव्यांग शासकीय योजना (Govt Scheme) दिव्यांगांच्या दारी हा कार्यक्रम घेतला आहे. या कार्यक्रमासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च आला. परंतु, हा कार्यक्रम घेणाऱ्या समाज कल्याण आणि दिव्यांग विभागाच्या अधिकाऱ्यांना हे दोन्ही बंधू दिसले नाही का? सरकारने पुन्हा एकदा ग्रामीण भागात दिव्यांगांचे सर्वेक्षण (Survey of Disabilities) करावे ही अपेक्षा आता दिव्यांगांसह मल्लेश जयस्वाल यांनी व्यक्त केली आहे.