Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana । तुम्हालाही घेता येणार 12 हजारांचा लाभ, पण मान्य करावी लागेल ‘ही’ अट

शासकीय योजना

Namo Shetkari Yojana । कृषी उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. सरकारकडून वेगवेगळ्या योजना देखील राबविल्या जातात. महत्त्वाचे म्हणजे अनेक शेतकऱ्यांना सरकारच्या या योजनांबद्दल माहिती नसते. त्यामुळे त्याचा त्यांना लाभ घेता येत नाही. सरकारची एक योजना आहे ज्यात तुम्हाला 12 हजारांचा लाभ घेता येईल.

Success Story । शेतकऱ्याची बातच न्यारी! कॅन्सरग्रस्त पुणेकराने केली केशराची यशस्वी शेती, वर्षाला मिळतेय लाखोंचे उत्पन्न

परंतु या योजनेसाठी काही अटी आहेत, जर तुम्हाला अटींची पूर्तता करता आली तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी 12 हजारांचा लाभ घेता येईल. या कल्याणकारी योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केला आहे.

Namo Shettale Abhiyan । पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त राबवली जाणार नवीन योजना, शेततळ्यासाठी मिळणार पैसे

जाणून घ्या पात्रता

  • महत्त्वाचं म्हणजे शेतकरी हा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभार्थी असावा.
  • शेतकरी महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
  • स्वतःचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले असावे.
  • त्याच्याकडे स्वतःची जमीन असावी.

Sharad Pawar । मोठी बातमी! दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर

दरम्यान, नमो शेतकरी योजनेचे (Namo Shetkari Sanman Scheme) 6000 रुपये दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हफ्त्यात ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. पीएम किसानसाठी पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Havaman Andaj । राज्यात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या हवामान खात्याचा इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *