Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी मिळणार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता

शासकीय योजना

Namo Shetkari Yojana । शेतकऱ्यांना सतत वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योजना (Government Schemes) आणत असते. ज्याचा त्यांना फायदा होत असतो. दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नमो शेतकरी योजनेची सुरुवात केली आहे. याचा लाभ देशभरातील करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. आता या योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Matru Vandana Yojana 2 । दुसरे कन्यारत्न प्राप्त झाल्यास मिळणार पैसे, काय आहे योजना? जाणून घ्या

दरम्यान, नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हफ्त्यात ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. पीएम किसानसाठी पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. परंतु योजनेची घोषणा होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळाला नाही.

Agriculture News । शेतकऱ्यांना देखील भरावा लागतो आयकर, काय सांगतो कायदा? जाणून घ्या

अशातच आता या योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेच्या पहिल्या हफ्त्याच्या वितरणासाठी राज्य सरकारकडून 1720 कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे. परंतु आता हा हप्ता दिवाळीच्या अगोदर दिला जाईल, अशी चर्चा सुरु आहे. याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

Havaman Andaj । राज्यात पावसाची पुन्हा हजेरी! येत्या 24 तासांत ‘या’ ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस

या दिवशी मिळणार पैसे

या योजनेचा पहिला हप्ता दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. या योजनेचे 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीअगोदर जमा व्हावेत असा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती कृषीमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे आता नमो शेतकरीचे 2000 रुपये आणि पीएम किसानचे 2000 रुपये (PM Kisan Yojana) असे एकूण चार हजार रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे.

Success story । जिद्द असावी तर अशी! कोरोनामुळे नोकरी गमावली, अपंग तरुणाने केळीतून केली लाखोंची कमाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *