Namo Shetkar Maha Sanmanman Yojana

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार प्रत्येकी २००० रुपये; तुम्ही पात्र आहात का? लगेचच करा चेक

शासकीय योजना

Namo Shetkar Maha Sanman Yojana | शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टीने फायदा व्हावा म्हणून केंद्र सरकारने पीएम किसान योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. मागच्या काही दिवसापूर्वी या योजनेचा चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून शेतकरी आता पंधराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेची फक्त घोषणा करण्यात आली होती मात्र अजूनही कोणत्याच शेतकऱ्याला याची रक्कम मिळाली नव्हती मात्र आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Sandalwood Plantation । करोडोंची कमाई करायची असेल तर आजच करा चंदन लागवड, अशी करा सुरुवात

केंद्र सरकारकडून कृषी विभागाने शेतकऱ्यांचा डाटा घेऊन राज्यातील प्रत्येक विभागातील शंभर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करून योजनेची पडताळणी केली आहे. त्यामुळे आता ज्या काही तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या त्या दूर झाला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा गणेशोत्सवापूर्वी लाभ दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. (Namo Shetkar Maha Sanman Yojana)

Pomegranate cultivation । शेतकऱ्याने करून दाखवलं! डाळिंब लागवडीतून 50 टनाचे उत्पादन घेत कमावले 70 लाख रुपये

सध्या पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतीतील उत्पन्न घटले आहे. त्यामुळे जर नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या खरीप हंगाम पिक काही ठिकाणी तर वाया गेला आहे. काही ठिकाणी वाया जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांसमोरील अडचणींचा डोंगर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याची तयारी सुरू केली आहे.

Havaman Andaj । तो आला, चिंब बरसला आणि पुन्हा एकदा लपंडावाचा खेळ सुरु केला; राज्यात पुन्हा पावसाने घेतली विश्रांती

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार या योजनेचा लाभ?

ज्या शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता मिळाला आहे. अशाच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी सरकारला एक हजार ७१२ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. मात्र यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई-केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *