Mulching Paper Subsidy

Mulching Paper Subsidy । ‘या’ सरकारी योजनेंतर्गत मिळत आहे प्लास्टिक मल्चिंगसाठी 50 टक्के अनुदान, त्वरित घ्या लाभ

शासकीय योजना

Mulching Paper Subsidy । शेतकऱ्यांची आता अलीकडच्या काळात शेती करण्याची पद्धत बदलली आहे. पूर्वी शेतकरी पारंपरिक पिके घेत असायचे. परंतु या पिकांना प्रत्येक वर्षी हमीभाव मिळतोच असे नाही. कालांतराने या पिकांचा भाव पडत चालला आहे. आता आधुनिक पिकांना चांगला भाव मिळत आहे. अशातच केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवत आहेत.

Land Measurement । जमीन मोजणीसाठी किती खर्च येतो? अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

विविध घटकांसाठी या योजनेच्या माध्यमातून अनुदान (Subsidy) दिले जाते. राज्य सरकार मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक आणि तुषार सिंचन वापराला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री सौर कृषी योजनेसारख्या अनेक योजना राबवत आहेत. अशातच आता सरकारकडून प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी अनुदान (Plastic Mulching Paper Subsidy) देण्यात येत आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत अनुदान मिळेल.

Milk Price । ऐन सणासुदीत पशुपालकांचं गणित बिघडलं! दुधाच्या किमती कमी आणि चारा महागला

3 महिन्यांसाठी भाजीपाला लागवडीसाठी आणि बहुवार्षिक फळबागांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी अनुदान मिळेल. या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहनदेखील कृषी विभागाकडून (Department of Agriculture) करण्यात येत आहे.

Havaman Andaj । राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता, तापमान घटल्याने अवकाळीचे संकट टळणार

किती मिळते अनुदान?

  • प्लास्टिक मल्चिंग पेपरचा हेक्टरी खर्च बत्तीस हजार असतो. त्यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाते. यानुसार जास्तीत जास्त हेक्‍टरी 16 हजार रुपये अनुदान मिळेल.
  • शिवाय डोंगराळ भागांत प्रतिहेक्टरअनुदानाचे प्रमाण हे 36 हजार आठशे रुपये मापदंडानुसार असते. खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच 18 हजार चारशे रुपये प्रति हेक्‍टर याप्रमाणे दोन एकरसाठी अनुदान मिळते.

Baramati Doodh Sangh । बारामती दूध संघाने दिलेल्या बोनसमुळे शेतकरी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

जाणून घ्या पात्रता

शेतकरी,बचत गट, शेतकरी समूह, शेतकरी उत्पादक कंपनी आणि सहकारी संस्था यांना योजनेचा लाभ घेता येतो.

Onion Rate । बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला आज सर्वाधिक किती दर मिळाला? वाचा एका क्लिकवर

कागदपत्रे

  • आधार लिंक असणाऱ्या बँक खात्याचे पासबुक झेरॉक्स
  • आधार कार्डची झेरॉक्स कॉपी
  • जमिनीचा सातबारा उतारा
  • आठ अ चा उतारा

KVP Scheme । शेतकऱ्यांसाठी खास योजना! गुंतवणूक केल्यास मिळेल दुप्पट परतावा, जाणून घ्या

अधिक माहितीसाठी या ठिकाणी करा संपर्क

योजनेच्या अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी तुम्ही संबंधित कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करू शकता.

Dhananjay Munde । आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा! मिळणार संसार उपयोगी साहित्य किट

असा करा अर्ज

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीम यावर अर्ज करावा लागणार आहे. तुम्हाला योजनेची संपूर्ण माहिती देऊन आणि कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज भरावा लागणार आहे.

MS Dhoni । धोनीकडे आहे ‘या’ लोकप्रिय कंपनीचा ट्रॅक्टर, ज्यामुळे शेतीची कामे होतात सोपी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *