MS Swaminathan Passes away । भारतातील हरितक्रांतीचे जनक एम.एस.स्वामीनाथन यांचे आज निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. चेन्नईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. स्वामीनाथन यांच्यावर दीर्घकाळापासून उपचार सुरू असून त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे.
Tractor New Update । ‘या’ कारणामुळे वाढत आहे दिवसेंदिवस ट्रॅक्टरची मागणी! जाणून घ्या सविस्तर..
स्वामीनाथन यांनी देशांमध्ये धान पिकाला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. शेतीमध्ये जास्त उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना मोठी मदत झाली आहे. मात्र त्यांच्या जाण्याने अनेक स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
दर्जेदार गूळ आणि काकवी तयार करण्याचे सुधारित तंत्र; जाणून घ्या सविस्तर
स्वामीनाथन यांना हरितक्रांतीचे जनक मानले जाते. त्यांच्यामुळे भारतातील गव्हाच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याचे देखील बोलले जाते. त्यांना अनेक राष्ट्रीय त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
एम.एस.स्वामीनाथन यांच्या निधनाने सगळीकडे शोक व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “भारताला कृषी क्षेत्रात आत्मसन्मान मिळवून देणारा कोट्यावधींच्या अन्नसुरक्षेची काळजी वाहणारा महान सुपुत्र आज भारत मातेने गमावला आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पद्मविभूषण जेष्ठ वैज्ञानिक, कृषी तज्ञ, डॉक्टर एम.एस.स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.