Moong Market । शेतमालाला जर चांगला बाजार भाव मिळाला तर शेतकऱ्यांना देखील समाधान मिळते. शेतकऱ्यांना शेत पिकाची लागवड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो आणि जर हा खर्च निघाला नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे पिकाला बाजार भाव मिळणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप गरजेचे असते. जर बाजार भाव मिळाला तरच शेतकऱ्यांना चांगले पैसे राहतात. दरम्यान खानदेशातील बाजार समितीमध्ये मुगाची आवक मागच्या वर्षी प्रमाणे यंदा देखील कमीच आहे. (Moong Market)
यावर्षी मुगाचे दर ११,८०० व कमाल 13,000 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 12,000 रुपये प्रति क्विंटल असल्याचे पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने चांगलीच विश्रांती घेतली. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे मुगाचे पीक ऑगस्ट महिन्यामध्ये वाया गेले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये मूक उत्पादनात 60 टक्के घट झाली आहे. त्यामुळे आता मुगाला चांगला दर मिळत आहे.
ऑगस्ट महिना सुरू होताच जवळपास पूर्ण महिना पावसाने हजेरी लावली नाही. त्यामध्ये मुगाची फुले गळून पडल. शेंगा हव्या तशा लागल्या नाहीत त्यामुळे काही शेतकऱ्यांचे पीक निम्मे हाती लागले. मात्र बाजार समिती आवक कमी आहे त्यामुळे मुगाला चांगला बाजार भाव मिळत आहे.
किती मिळतोय बाजारभाव?
दरम्यान, काही शेतकऱ्यांनी तर मुग पीक मोडून आता रब्बी हंगामासाठी मशागत सुरू केली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी मुगाचे दर जास्त आहेत. यावर्षी उत्पादनात जास्त घट झाल्यामुळे मुगाचे दर वाढले असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. मागील वर्षी मुगाला सरासरी 10 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. मात्र यंदाच्या वर्षी हा दर सरासरी 12 हजार रुपयांवर पोहोचला आहे त्यामुळेमुग उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.