Milk Subsidy । राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) केला जातो. पण पशुपालकांवर यंदा आर्थिक संकट आले आहे. कारण यंदा दुधाच्या दरात (Milk prices) कमालीची घसरण झाली आहे. पशुखाद्य देखील महाग झाले आहे. त्यामुळे पशुपालक निराश झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पशुपालकांना दिलासा देण्यासाठी सरकारने दुधासाठी अनुदानाची (Subsidy for milk) घोषणा केली आहे.
अनुदानासाठी पशुपालकांना सहन करावा लागतोय नाहक त्रास
पण यासाठी जाचक अटी ठेवल्या आहेत. (Milk prices falls down) पशुपालकांना अटींची पूर्तता करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे, असे पाहायला मिळत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सरकारकडून हे अनुदान 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत देण्यात येणार आहे. केवळ महिनाभर पाच रुपये अनुदानासाठी पशुपालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. (Cow milk subsidy)
Success Story । नोकरीला केला जय महाराष्ट्र! फळशेतीतून हा शेतकरी कमावतोय लाखो रुपये
यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. राज्य सरकारने दूध उत्पादकांना पाच रुपयांचे अनुदान मिळवण्यासाठी अटींची-शर्तींची यादीच जाहीर केली आहे. अनुदानासाठी शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांची नोंदणी पशुधन पोर्टलवर करून आधारकार्ड बँक खात्यासोबत लिंक करावे लागणार आहे. (Vijay Vadettiwar on Milk Subsidy)
अनुदानासाठी इतका खटाटोप कशाला?- विजय वडेट्टीवार
इतकेच नाही तर सरकारने पशुधनाचे टॅगिंग आणि ऑनलाइन नोंदणी करणे देखील बंधनकारक आहे, असे म्हटले आहे. त्यात हे अनुदान फक्त गायीच्या दुधासाठी असणार आहे. म्हशीच्या दुधाला हे अनुदान मिळणार नाही. मग कमी वेळ आणि केवळ गाईच्या दुधासाठी मिळणाऱ्या या अनुदानासाठी इतका खटाटोप कशाला पाहिजे? असा सवाल वड्डेटीवार यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना निश्चित केलेल्या दरानुसार भाव मिळत नाहीत. त्यामुळे पशुपालकांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात होती. सरकारने देखील पशुपालकांच्या हितासाठी अनुदानाची घोषणा केली पण याचा शेतकऱ्यांना फायदा होण्याऐवजी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
Milk Subsidy । पशुपालका़ंसाठी महत्त्वाची बातमी, आता टॅगिंग असेल तरच मिळणार दुध अनुदान