Milk Subsidy

Milk Subsidy । दूध अनुदानाची घोषणा हवेतच विरली, अजूनही जीआर नाही

पशुसंवर्धन

Milk Subsidy । अनेकजण शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून अनेकजण दुध व्यवसाय (Milk business) करतात. अनेकांना या व्यवसायात चांगला नफा मिळवता येतो. परंतु, यंदा हा व्यवसाय अडचणीत आला आहे. कारण यंदा दुधाचे दर (Milk rate) कमालीचे घसरले आहेत. शिवाय पावसाअभावी पिके जळून गेली आहेत. पिके जळाल्याने चारा खूप महाग झाला आहे. पशुपालनाचा व्यवसाय देखील धोक्यात आला आहे. (Milk rate falls down)

Solar pump । शेतकऱ्यांनो, या सरकारी योजनेचा लाभ घेऊन मोफत वापरा वीज, जाणून घ्या योजना

पशुपालकांमध्ये नाराजी

याच पार्श्वभूमीवर पशुपालकांना दिलासा देण्यासाठी मागील आठवड्यात पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाकडून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान (Subsidy for Milk) देण्याची घोषणा केली होती. परंतु, अजूनही त्यावर कोणतीही पाऊले उचलली नाहीत. यामुळे पुन्हा एकदा पशुपालकांमध्ये राज्य सरकारविरोधात नाराजीचे वातावरण पसरले आहे.

Crop Damages Limit । अवकाळीने झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईबाबत शासनाचा मोठा निर्णय

दरम्यान, जानेवारी महिना सुरु होऊनही राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति 26 ते 27 रुपये दराने दुधाची विक्री करावी लागत आहे. जर दूध अनुदानाबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर दूध उत्पादक शेतकरी संघटनांनी राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. अशातच राज्यामध्ये जानेवारी महिन्याच्या पहिल्या दिवसापासून दूध संकलनाचे नवीन नोंदणी सुरु होते.

Vegetable rate । ट्रक चालकांच्या संपाचा मोठा परिणाम, भाज्यांचे दर एका रात्रीत झाले दुप्पट

पशुपालकांच्या पदरी केवळ निराशा

या नवीन नोंदणीमध्ये तरी दूध उत्पादकांना अनुदान मिळेल, अशी अपेक्षा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होती. पण त्यांच्याही पदरी निराशा आली आहे. जरी अनेक शेतकरी जोडव्यवसाय म्हणून पशुपालनाच्या व्यवसायाकडे वळत असले तरी सध्या हा व्यवसाय धोक्यात आला आहे. दूध उत्पादक शेतकरी सरकारचे याकडे लक्ष नसल्याचा आरोप करत आहेत.

Agricultural Loans । मोठी बातमी! कृषी कर्ज वसुलीसाठी महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय

गेल्या वर्षीपेक्षा यंदा दुधाचे दर आठ ते दहा रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी सरकारवर नाराजी व्यक्त करत आहेत. दुधाला सध्या पाच रुपये अनुदान जाहीर केले आहे. परंतु ते देखील अद्याप मिळाले नाही. पशुखाद्याचे भाव ३५०० ते ४००० क्विंटलपर्यंत गेले आहेत. एकंदरीतच दूध उत्पादनाचा खर्च खूप वाढला आहे.

Desi jugad । शेतकऱ्यांच्या जुगाडापुढे इंजिनिअरही फेल, नदी पार करण्यासाठी बनवली बोट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *