Milk Subsidy

Milk Subsidy । लिटरमागे दुधाला ५ रुपये अनुदान द्या, दूध उत्पादकांची सरकारकडे मागणी

पशुसंवर्धन

Milk Subsidy । शेतीत ज्या शेतकऱ्यांना फारशी कमाई न करता आल्याने ते शेतीसोबत पशुपालनाचा (Animal husbandry) व्यवसाय सुरु करतात. देशात अनेकजण शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) करत असल्याने अनेकांना खूप फायदा होत आहे. जर तुम्हाला या व्यवसायात जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला जास्त नफा मिळवून देणाऱ्या जनावरांची निवड करावी लागते. परंतु, सध्या हा व्यवसाय (Milk price) अडचणीत आला आहे.

Electric Bull । काय सांगता? ‘हा’ इलेक्ट्रिक बैल ठरतोय शेतकऱ्यांसाठी वरदान

दुधाच्या दरात घसरण

कारण मागील काही दिवसांपासून दुधाचे दर प्रचंड घसरले (Milk rate falls down) आहेत. दुधाला २५ ते २६ रुपये प्रति लिटर दर (Milk rate) मिळत आहे. दुधाचे दर कमी झाल्याने आणि चारा महाग झाल्याने दूध उत्पादकांना खूप मोठा फटका सहन करावा लागत आहे. यामुळे दूध उत्पादकांमध्ये नाराजी पसरली आहे. सरकारदेखील याकडे लक्ष देत नाहीत, असा आरोप दूध उत्पादक करत आहेत.

Nursery Subsidy । शेतकऱ्यांनो, सोडू नका अशी संधी! ‘या’ सोप्या पद्धतीने आजच मिळवा नर्सरी अनुदान, जाणून घ्या अर्जपद्धती

५ रुपये अनुदान द्या

दूध उत्पादक आता सरकारकडे प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची मागणी करत आहेत. नुकतीच नागपूर येथे पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज डेअरी) अध्यक्ष भगवान पासलकर (Bhagwan Pasalkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत दूध दराबाबत एक बैठक पार पडली. यावेळी दूध भुकटीचे घटलेले दर पर्यायाने दूध दरातील घसरण लक्षात घेता बँक खात्यात अनुदान जमा करावे अशी मागणी केली.

Kubota LX2610 । 6 वर्षांच्या उत्कृष्ट वॉरंटीसह 25 HP चा शक्तिशाली ट्रॅक्टर, त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या

त्याशिवाय पशुखाद्य आणि चाऱ्याच्या वाढत्या किमती उत्पादन खर्चाचा विचार लक्षात उत्पादकांना प्रतिलिटर चार ते पाच रुपयांचा फटका बसत आहे. जर दूध उत्पादकांना अनुदान दिले तर त्यांना दिलासा मिळू शकेल, असे पासलकर म्हणाले आहे. पुणे जिल्हा दूध संघाचे सरासरी दैनंदिन गायीच्या दूध संकलनापैकी ८० ते ८५ हजार लिटर दूध पॅकिंगद्वारे विक्री केली जाते.

Success Story । पोलिसाचा नादच खुळा! नोकरीला लाथ मारली अन् चक्क सुरू केली पांढऱ्या चंदनाची शेती

…..तर दूध उत्पादकांना होईल फायदा

त्याशिवाय, १० हजार लिटर दुधातून दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करण्यात येते. उरलेले दूध २९ रुपये दराने खासगी डेअरीला विकले जात आहे, त्यामुळे दूध उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. असे असल्याने आता सरकार दूध उत्पादकांची मागणी मान्य करणार का? याकडे लक्ष लागले आहे. सरकारने जर ही मागणी मान्य केली तर त्याचा दूध उत्पादकांना फायदा होईल.

Onion Rate । सध्या कांद्याला किती भाव मिळतोय? जाणून घ्या मार्केटमधील रेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *