Milk Rate

Milk Rate । पशुपालकांना मोठा धक्का! दुधाच्या दरात पुन्हा घसरण

पशुसंवर्धन

Milk Rate । अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) करतात. हा असा व्यवसाय आहे ज्यात शेतकऱ्यांना शेती करत करत भरघोस नफा मिळतो. पण जर तुम्हाला या व्यवसायात (Animal husbandry) चांगला नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या पशूंच्या जातींची निवड करावी लागेल. पण सध्या हा व्यवसाय अडचणीत आला आहे. कारण दुधाचे दर कमालीचे घसरले (Milk Rate Falls) आहेत.

Crop Insurance । मोठी बातमी! ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला पीकविमा परतावा

इतकेच नाही तर पशुखाद्याचे दर (Animal feed rates) देखील गगनाला भिडले आहेत. अशातच आता दुधाचे दर (Milk price) पुन्हा दोन रुपयांनी कमी झाले आहेत. पशुखाद्याचे वाढलेले दर आणि घसरलेल्या दुधाच्या दराने पशुपालक हैराण झाले आहेत. दुधाचे दर पुन्हा वाढावे यासाठी शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलन करण्यास सुरुवात केली. पण त्याचा कोणताही फायदा शेतकऱ्यांना झाला नाही.

Farmers Protest । शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लागू केले कलम 144, इंटरनेट सेवाही बंद

दरम्यान, मागील वर्षी 34 रुपये दराने घेतले जाणारे दूध सध्या 25 रुपयांपर्यंत घसरले असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मागील आठ दिवसांअगोदर प्रतिलिटर 50 पैशांनी त्यानंतर पुन्हा चार दिवसांपूर्वी प्रति लिटर दीड रुपये दराने दुधाचे दर कमी केले आहे. शेतकऱ्यांनी जर आता कमीत कमी खर्चात पशुपालन करून दूध उत्पादन करण्याचे तंत्र वापरले नाही तर त्याचा त्यांना तोटा बसेल.

Potato Price । बापरे! अमेरिकेतील 1 किलो बटाट्याची किंमत जाणून तुम्हीही व्हाल चकित

चवळीचा पाला

दूध उत्पादनात वाढ (Increase in milk production) होण्यासाठी तुम्ही चवळीच्या पाल्याचा समावेश करू शकता. या पाल्यात अनेक पौष्टिक घटक असतात. ज्यामुळे उत्पादनात वाढ होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचा जनावरांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही.

Ritha Farming । शेतकरी बंधुनो, ‘या’ झाडांची लागवड करून एकरात मिळवा 10 लाखांचं उत्पन्न

करा हे उपाय

यासाठी तुम्हाला एका वेळी 250 ग्रॅम गव्हाचे पीठ, 50 ग्रॅम मेथी, 100 ग्रॅम गुळ, एक कच्चे खोबरे, 25-25 ग्रॅम जिरे या गोष्टींची गरज भासेल. गहू पीठ, मेथी, जिरे आणि गूळ चांगला शिजवून घेऊन खोबरे बारीक करून यामध्ये टाका. हे थंड झाल्यावर ते जनावरांना खाऊ घाला. जनावरांना सकाळी रिकाम्या पोटी उन्हाळयात हे 2 महिने खायला द्यावे.

Cotton Rate । कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त, पेटवून दिली कापसाने भरलेली गाडी

त्याशिवाय तुम्ही दररोज जनावरांना गव्हाच्या पिठाचा गोळा देऊ शकता. मोहरीचे तेल आणि गव्हाच्या पिठापासून दूध वाढवण्यासाठी, तुम्ही दररोज 200 ते 300 ग्रॅम मोहरीचे तेल, 250 ग्रॅम गव्हाचे पीठ असलेला गोळा देण्याचा उपाय करू शकता. हे लक्षात ठेवा की हा गोळा दिल्यानंतर लगेचच जनावराला पाणी पाजू नये, नाहीतर जनावरांना खोकला येईल.

Mahatma Phule Yojana । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लोकसभेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पन्नास हजार रुपये,अजित पवार यांची मोठी घोषणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *