Milk Rate

Milk Rate | दूध दराबाबत सरकारची महत्त्वपूर्ण बैठक! नेमका काय झाला निर्णय?

बाजारभाव

Milk Rate । मागील काही दिवसांपासून दुधाचे दर खूप कमी (Milk Rate Falls Down) झाले आहेत. त्यामुळे पशुपालकवर्ग अडचणीत आला आहे. घसरलेल्या दुधाच्या दरांमुळे दुधाळ जनावरे कवडीमोल भावात विकावी लागत आहेत. कमी दूध दरावरून (Milk Price) राज्याचे वातावरण खूप पेटले आहे. पशुपालाकांसह आता शेतकरी संघटना देखील खूप आक्रमक झाल्या आहेत. पशुपालाकांचे खूप नुकसान होत आहे.

Government Schemes । फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी सरकार देतंय 40 हजारांचे अनुदान, असा घ्या लाभ

दरात घसरण

सध्या राज्यातील काही ठिकाणी २५ रुपये आणि काही ठिकाणी २६ रुपये दुधाला दर (Cow Milk Price) मिळत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सरकारने दूध दराबाबत एक परिपत्रक देखील काढले होते. परंतु परिपत्रकानुसार ९ ते १० रुपये दर मिळत आहे. घसरलेल्या दरांमुळे पशुपालाकांसह शेतकरी संघटना आक्रमक झाल्याने सरकारने याबाबत एक बैठक बोलावली होती.

Success Story । दुधाला दर नसल्याने शेतकऱ्याने केला स्वतःचा पेढे बनविण्याचा व्यवसाय सुरु; आता अख्ख्या गावाचं दूध घेतो..गावातील डेअरी पडल्या बंद

परंतु, दूध दराबाबत बैठक निष्फळ ठरली आहे. कारण बैठकीत दरांबाबत कोणताच निर्णय झाला नाही. त्यामुळे शेतकरी नेते सदाभाऊ खोत, अजित नवले आणि इतर संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांनी परिपत्रकाची अतिथीगृहावरच होळी केली. येणाऱ्या २४ नोव्हेंबरला संपूर्ण राज्यात आंदोलन करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे वातावरण आणखी पेटू शकते.

Subsidy for Fodder Seeds । खुशखबर! १०० टक्के मिळणार चारा बियाण्यांसाठी अनुदान, जाणून घ्या अर्जप्रक्रिया

सरकारी आदेशाची करणार होळी

दूध कंपन्यांनी राज्य सरकारने काढलेला दूध दर आदेश धुडकावून लावला असून सरकारने जाहीर केल्याप्रमाणे दूध कंपन्यांनी ३४ रुपये दर देणार नाहीत. येत्या २४ नोव्हेंबरला दूध संकलन केंद्रांवर राज्यात शेतकऱ्यांनी होळी करून वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन तीव्र करण्यात यावे, असे आवाहन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीकडून करण्यात आले आहे.

Electricity Issue । दिलासादायक! वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉट्सअॅपवर करता येणार तक्रार, कसं ते जाणून घ्या

दूध दरांवरून सरकार निष्काळजीपणा करत आहेत. तसेच सरकारचा आदेश जुमानला जात नाही. सरकारी दर देणार नाही अशी कंपन्यांनी भूमिका घेतली आहे, एकंदरीत या निर्णयाचा पशुपालकांना खूप मोठा फटका बसत आहे. यंदा कमी पावसामुळे चारा देखील खूप महाग झाला आहे. पशुपालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

Paddy Farming । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ पिकाला मिळणार बोनस, सरकारची मोठी घोषणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *