Milk Rate । मागील काही दिवसांपासून दुधाचे दर (Milk price) खूप पडले आहेत. दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. शिवाय चाऱ्याचे दर देखील वाढले आहेत. एकंदरीतच शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. त्यामुळे त्यांना दूध व्यवसाय (Milk business) परवडत नाही. याच कारणावरून राज्यभर दूध दराचा प्रश्न पेटला आहे. सरकार देखील याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप केला जात आहे.
How to get government land on rent । सरकारी जमीन भाड्याने कशी मिळवायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
मिळणार पाच रुपये अनुदान
अशातच आता दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान (Cow milk subsidy) देण्याची घोषणा केली आहे. सहकारी दूध संघाला शासकीय अनुदान (Milk subsidy) मिळणार आहे, असे त्यांनी अधिवेशनात सांगितले आहे. सरकारी घोषणेमुळे दररोज जवळपास ११ लाख ७५ हजार रूपये मिळणार आहेत.
Business Idea । शेतीसोबत मोबाईल टॉवर लावा, लाखो रुपयांचा होईल नफा; जाणून घ्या कसं ते?
दरम्यान, सहकारी दूध संघांना गायीच्या दुधाला २९ रुपये प्रतिलिटर दर (Cow Milk Price) देणे बंधनकारक असेल. हे अनुदान एक जानेवारी ते २९ फेब्रुवारी या दरम्यान मिळेल. त्यानंतर शासकीय अनुदानाविषयी शासनदरबारी चर्चा केली जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील सहकारी दूध संघाकडे दूध विकत असणाऱ्या उत्पादकांना याचा फायदा होईल.
या जिल्ह्याला होणार फायदा
परंतु, हे लक्षात घ्या की राज्यातील बीड जिल्ह्याला याचा लाभ होणार आहे. सध्या ३:५, ८:५ एस.एन.एफ फॅटच्या दुधाला २६ रुपये लिटर भाव मिळत आहे. त्यामुळे सर्व दूध उत्पादक गायीच्या दुधाला ४० रुपये लिटर भाव द्यावा, अशी मागणी करत आहे. अपेक्षित दर मिळत नसल्याने त्याविरोधात ठिकठिकाणी रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करत आहेत. जेणेकरून सरकारचे दूध उत्पादकांकडे लक्ष जाईल.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शासकीय अनुदान हे केवळ सहकारी दूध संघाला मिळणार असल्याने सर्व दूध उत्पादकांना याचा फायदा मिळणार नाही. अनुदान मिळवण्यासाठी बँक खाते आधारशी संलग्न असावे. दरम्यान, बीड जिल्ह्यातून सहकारी दूध संघाकडे २ लाख ३५ हजार लिटर दूध संकलित केले जाते. सरकारी निर्णयाचा फक्त 28 टक्के दूध उत्पादकांना फायदा होणार आहे.