Milk Price

Milk Price । पशुपालक चिंतेत! दूध दरात कमालीची घसरण, खुराकाचेही वाढले दर

बाजारभाव

Milk Price । निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सतत बसत असतो. काही जण जोडव्यवसाय म्हणून पशुपालन करतात. पशुपालनातून अनेक शेतकरी आज लाखो रुपयांची कमाई करत आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून हा व्यवसाय देखील अडचणीत आला आहे. दूध दरात कमालीची घसरण झाली आहे. इतकेच नाही तर खुराकाचेही दर (Animal feed rates) खूप वाढले आहेत.

Unseasonal Rain । पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान

महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत आहेत. कारण दुधाचे दर अचानक कोसळले (Milk Price Falls Again) आहेत. त्यामुळे संतप्त दूध उत्पादक आंदोलन करत आहे. दर (Milk Rate) घसरल्याने त्याचा मोठा आर्थिक परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होत आहे. पूर्वी गायीचे दूध येथे ३५ रुपये प्रतिलिटर होते, मात्र आता ते २७ रुपये प्रतिलिटरवर आले आहे. असा आरोप शेतकरी करू लागले आहेत.

Sugarcane Workers । साखर कारखान्यांना मोठा धक्का! ऊसतोडणी मजुरांची घटली संख्या

सरकारने नेमली समिती

दूध दरातील घसरण रोखण्यासाठी राज्याचे दूध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच समिती स्थापन केली होती. त्यात खासगी व सहकारी दूध संघांच्या संचालकांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. पशुसंवर्धन तथा दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ३५ रुपये दुधाला दर यावा असे आदेश दिले होते. परंतु आता त्यांच्या या आदेशाचे काय झाले? असा सवाल निर्माण होत आहे.

Farmers Products । नादच खुळा! शेतकऱ्यांनो, आता आपला शेतमाल थेट मॉलमध्ये विकला जाणार

खुराकाचे वाढले दर

चाऱ्यासह खुराकाचे, सरकी पेंड, वालिस दरही खूप वाढले आहेत. किमतीचा विचार केला तर कांडी पेंड १ हजार ४०० वरून १ हजार ७०० रुपये आणि सरकी पेंड २ हजार रुपयांवरून २ हजार ६५० रुपये प्रमाणे खुराकाच्या दरात ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. ऊस आणि चारा कुट्टीचे दर वाढले आहेत. यामुळे पशुपालक कमालीचे नाराज झाले आहेत.

Onion Price । शेतकऱ्यांनो, अशा प्रकारे बाजारात वाढवा तुमच्या कांद्याची किंमत, होईल फायदाच फायदा

एकंदरीतच सरकारने नेमलेल्या समितीसह पशुसंवर्धन विभागदेखील याकडे दुर्लक्ष करत आहेत. पशुपालनाचा व्यवसाय पुन्हा एकदा धोक्यात आला असून आता याकडे सरकार कितपत लक्ष देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दुधाची नासाडी केल्यावरच सरकारला जाग येईल का? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. शेतकरी रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करत आहेत.

Insurance । आता गुंठ्याच्या शंभराव्या भागाचा मिळणार विमा, कसे ते जाणून घ्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *