Milk Busniess

Milk business । महाराष्ट्रातील ‘हे’ अख्ख गाव करतंय दूध व्यवसाय, होतेय लाखोंची कमाई

पशुसंवर्धन

Milk business । भारतात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. अनेकजणांना शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने ते शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) करतात. दुधाळ जनावरांची किंमत बाजारात सर्वात जास्त असते. या व्यवसायात जास्त नफा मिळवायचा असेल तर जास्त दूध देणाऱ्या जनावरांची निवड करावी लागते. बाजारात अशी काही जनावरे आहेत जी जास्त दूध देतात. (Animal husbandry)

Germany Farmer Protest । मोठी बातमी! सरकारविरोधात शेतकरी आक्रमक, ‘या’ ठिकाणी ट्रॅक्टर घेऊन उतरले रस्त्यावर

पशुपालनातून जास्त कमाई करण्यासाठी पशुपालक दिवसरात्र मेहनत करतात. योग्य नियोजन आणि प्रचंड मेहनत केली तर या व्यवसायांत चांगला नफा मिळतो. या व्यवसायात नफा जास्त मिळत असल्याने आता तरुण देखील लाखो रुपयांची नोकरी सोडून हा व्यवसाय करू लागले आहेत. राज्यात एक असे गाव आहे जे हा व्यवसाय करते. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील बोरगडी या संपूर्ण गावात हा व्यवसाय केला जात आहे.

Wheat crops । गव्हाच्या पिकामध्ये गुळासोबत करा ‘हा’ अनोखा प्रयोग, उत्पन्नात होईल वाढ

वर्षाला मिळतो एक लाख रुपयांपर्यंत नफा

सध्या हणमंतू गोपुवाड यांच्याकडे 10 म्हशी आहेत. त्यापैकी 6 म्हशी दूध देत असून या म्हशी सकाळ आणि संध्याकाळी दोन वेळा तब्बल 50 लिटर दूध देतात. या दुधाची किंमत ६० रुपये प्रतिलिटर इतकी आहे. ते या दुधाची गावाजवळील हिमायतनगर शहरात नेऊन विक्री करतात. यातून त्यांना दररोज 2500 ते 3000 रुपये उत्पन्न मिळते. खर्च वजा करून त्यांना प्रत्येक महिन्याला सुमारे एक लाख रुपयांचा नफा मिळतो. या दूध व्यवसायातून त्यांनी 5 एकर जमीनही खरेदी केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोपुवाड यांनी प्रत्येक शेतकऱ्याने गाई पालन हा साईड बिझनेस म्हणून करावा, असा सल्ला देखील दिला आहे.

Farming on AI । काय सांगता! बारामतीत केली जातेय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर शेती

संपूर्ण गावाने सुरु केला दुधाचा व्यवसाय

हे लक्षात घ्या की हनुमंतू गोपुवाड हे दुसऱ्याच्या शेतात पहारेकरी म्हणून काम करताना गावात म्हैस घेऊन दुधाचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांनी गावातील अनेकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेत दूध व्यवसाय सुरू केला. त्यांचा नफा पाहून येथील तरुण शेतकरी देखील दूध व्यवसायाकडे वळू लागले आहेत. आता त्यांना नोकरीसाठी घराबाहेर जावे लागत नाही.

Sugarcane workers । ऊसतोड कामगारांबाबत सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

सरकारकडून मिळते मदत

आता सरकारकडून देखील गायी आणि म्हशींच्या पालनासाठी मदत करण्यात येत आहे. दुभत्या जनावरांच्या संगोपनासाठी नाबार्ड (NABARD) पशुपालकांना चांगले अनुदान देत आहे. तसेच अनेक राज्य सरकारही त्यांच्या स्तरावर शेतकऱ्यांना पशुसंवर्धनासाठी आर्थिक मदत करत आहेत. इतकेच नाही तर अनेक बँका पशुपालनासाठी स्वस्त आणि सवलतीच्या दरात कर्जही देत आहेत.

Papaya Rate । रक्ताचं पाणी करून बाग फुलवली मात्र तरीही शेतकऱ्याच्या पदरी निराशाच, पपईच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *