Measuring Land । अनेकांकडे जमीन असते. तर काहीजण ती विकत घेत असतात. परंतु जमिनीची नोंदणी करणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आपली जमीन मोजण्यासाठी सर्वात अगोदर नोंदणी करावी लागते. त्यानंतर मोजणीसाठी ठराविक तारीख दिली जाते. नोंदणीसाठी काही शुल्क आकारले जाते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात.
यात शेतकऱ्यांचा वेळही खर्च होतो आणि मोजणीही लवकर केली जात नाही. परंतु आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला स्वतः तुमच्या जमिनीची मोजणी करता येणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे मोबाईल असणे गरजेचे आहे. मोबाईलच्या मदतीने काही मिनिटातच तुम्ही मोजणी करू शकता. विशेष म्हणजे त्यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च येणार नाही. कसे ते जाणून घ्या.
जर तुम्ही नवीन घर बांधत असाल तर तुम्हाला त्या प्लॉटच्या दिशेची माहिती योग्य असायला पाहिजे. कारण वास्तुनुसार शयनकक्ष, मंदिर, स्वयंपाकघर आणि शौचालय हे योग्य दिशेने बांधतात. आता तुम्हाला तुमच्याच मोबाईलवरून फक्त एकाच क्लिकवर त्या जमिनीची किंवा प्लॉटची दिशा समजू शकते.
GPS एरिया कॅल्क्युलेटर
अलीकडच्या काळात जवळपास प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. त्याच्या मदतीने तुम्हाला फक्त माहिती आणि मनोरंजन मिळेल असे नाही. आता तुम्ही त्याचा वापर करून जमीन मोजू शकता. त्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये GPS फील्ड एरिया मेजर किंवा GPS एरिया कॅल्क्युलेटर हे अॅप डाउनलोड करा. जे तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर सहज मिळेल. हे अॅप उघडल्यानंतर काही क्षणातच तुमच्यासमोर एक नवीन पृष्ठ येईल. त्यानंतर सर्च करा.
फॉलो करा ही सोपी प्रोसेस
आता मोजमाप करायचे असणारे ठिकाण शोधून त्या चित्रानुसार 1 क्रमांकाच्या बटणावर क्लिक करा. क्लिक करताच तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला एकूण तीन पर्याय पाहायला मिळतील. तुम्हाला पर्याय क्रमांक २ वर क्लिक करावे लागणार आहे. आता तुम्हाला ज्या ठिकाणी मोजमाप करायचे आहे त्या जागेला हळू हळू स्पर्श करावे. तुम्हाला संबंधित जमिनीचे किंवा शेताचे मोजमाप समजू शकेल.
कंपास अॅप
तसेच जर तुम्हाला प्लॉटची दिशा जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये कंपास अॅप डाउनलोड करावे लागणार आहे. यानंतर प्लॉटच्या नकाशावर स्मार्टफोन लावा.उदाहरणार्थ तुमचा प्लॉट 20 x 40 स्क्वेअर फूट असल्यास मोबाईलमध्ये एकूण 205 अंश दाखवेल. तुम्हाला तुमचा मोबाईल शून्य (0) अंशापर्यंत पोहोचेपर्यंत फिरवावा लागेल. हे लक्षात घ्या की ज्या ठिकाणी 0 डिग्री येते ती तुमच्या मोबाईलची योग्य दिशा असेल.