Market Yard

Market Yard | लासलगाव आणि बारामती बाजार समिती ठरली अव्वल! पणन संचालनालयाने यादी केली जाहीर

बातम्या

Market Yard | मागील वर्षांपासून राज्यातील बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीर होत आहे. पणन संचालनालयामार्फत ही क्रमवारी जाहीर करण्यात येते. नुकतीच यंदाची बाजार समिती क्रमवारी जाहीर झाली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव ( Lasalgaon) आणि पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati) बाजार समितीने संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला आहे.

Narendr Modi । शेतकऱ्यांसाठी शरद पवारांनी 60 वर्षात काय केलं? नरेंद्र मोदींचा सवाल

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पांतर्गत ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. 2022 -23 या आर्थिक वर्षातील कामगिरीच्या आधारावर ही क्रमवारी समोर आली आहे. राज्यामध्ये असणाऱ्या एकूण 305 बाजार समित्यांपैकी लासलगाव आणि बारामती बाजार समितीने बाजी मारली आहे. दरम्यान वाशीम जिल्ह्यातील कारंजा (लाड) बाजार समिती दुसऱ्या स्थानावर असून अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बाजार समिती तिसऱ्या क्रमांकावर आहे. पणन संचालक डॉ. केदारी जाधव यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Soybean Rate । सोयाबीनच्या दरात चढ की उतार? जाणून घ्या

क्रमवारी जाहीर झाल्याचे फायदे

1) बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर झाल्यामुळे इतर बाजार समित्यांच्या तुलनेत शेतकरी शेतमाल नेत असलेल्या बाजार समितीचे स्थान शेतकऱ्यांना समजणार आहे.

2) शेतकऱ्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने अधिकाधिक सुविधा देण्याची निकोप स्पर्धा बाजार समितीमध्ये निर्माण होण्यास चालना मिळणार आहे.

कोणत्या निकषांच्या आधारे क्रमवारी जाहीर होते ?

1) शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्री व्यवस्थेसाठी बाजार समितीत असलेल्या पायाभूत आणि इतर सुविधा

2) बाजार समित्यांची आर्थिक व वैधानिक कामकाज,

3) बाजार समित्यांचा योजना आणि उपक्रम राबविण्यातील सहभाग

Onion Rate । कांद्याला आज सर्वाधिक किती दर मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *