Mangoor Fish Farming । राज्यात मोठ्या प्रमाणावर मत्स्यपालन (Fisheries) होते. विविध प्रकारचे मासे (Fish types) सध्या उपलब्ध आहेत. प्रकारानुसार माशांच्या किमती (Fish Price) आहेत. मासे आरोग्यासाठी खूप फायदेशीर (Fish benefits) आहेत. त्यामुळे डॉक्टरही रुग्णांना मासे खाण्याचा सल्ला देतात. परंतु, काही असे मासे आहेत, ज्याचे सेवन केल्याने आरोग्याला धोका निर्माण होतो. धक्कादायक बाब म्हणजे धोकादायक असूनही या माशाची विक्री केली जाते.
मांगूर (Mangoor) हा मासा आरोग्याला हानीकारक आहे. भारतात या माशाच्या विक्रीला बंदी घातली आहे. असे असूनही हा मासा (Mangoor Farming) महाराष्ट्रासह काही राज्यात विकला जात आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलकडून (National Green Tribunal) या माशाला 2000 सालीच बॅन करण्यात आले होतं. या माशाची (Mangoor Fish) लांबी 3 ते 5 फूट असते. त्याचं वजन 3 ते 4 किलो असते. हा मासा अस्वच्छ पाणी आणि दलदलीच्या ठिकाणी आढळतो.
मुलाला शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको ग बाई, वावरातल्या कारभाऱ्याला मिळेना कारभारीण
अनधिकृत मांगूर मत्स्यपालन
उजनी जलाशयात पुणे जिल्ह्यातील प्रामुख्याने दौंड आणि इंदापूर, सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि करमाळा व नगर जिल्ह्यांतील कर्जत आणो श्रीगोंदा तालुक्यांतील परवानाधारक मत्स्य व्यावसायिक, विनापरवाना मत्स्य व्यावसायिक अनधिकृत लहान मासळी मासेमारी करत आहे, असे आढळून आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या विरोधात प्रशासन आक्रमक झाले आहे.
कडक कारवाई होणार
याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी उजनी जलाशयात लहान मासळी मासेमारी करणारे मत्स्य व्यावसायिक तसेच जलाशयालगत संपादित क्षेत्रात अनधिकृतपणे प्रतिबंधित मांगूर मत्स्यपालन करणाऱ्यांवर संयुक्त कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग, पोलिस विभाग, महसूल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक मच्छीमार संघटनांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश देण्यात आले आहेत.
Farmers Suicide । आत्महत्येबाबत महाराष्ट्र अग्रेसर; धक्कादायक आकडेवारी आली समोर
उजनी जलाशयामध्ये लहान मासळी मासेमारी करू नये. तसेच लहान मासळी मासेमारीकरिता वापरण्यात येणारी जाळी आणि इतर साहित्य तातडीने नष्ट करावे. प्रतिबंधित मांगूर मत्स्यपालन करणाऱ्यांनी त्यांच्याकडील मांगूर माशांचा साठाही नष्ट करण्यात यावा. उजनी जलाशय संपादित क्षेत्रात असणारी शेततळी नष्ट करावी. समजा संपादित क्षेत्रात कोणताही गैरप्रकार आढळून आला तर संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल.