Mango Pest । सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूसला (Hapus) जगाच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. पण यंदा हापूस आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. याला कारण आहे बदलते हवामान. (Climate Change) या हवामानामुळे आंब्यावर रोग (Diseases on mango) पडत आहे. याचा मोठा फटका आंबा पिकाला बसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
Farmer Relief Fund । बिग ब्रेकिंग! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३३२ कोटी रुपये मंजूर
वाढला ‘थ्रिप्स’चा प्रादुर्भाव
देवगड, मालवण आणि वेंगुर्ला या तालुक्यांसह जिल्ह्यात बहुतांश भागात आंब्याची लागवड (Mango Cultivation) केली जाते. यामध्ये देवगड हापूसला देशाच्या विविध बाजारपेठांसह जगभरात सर्वात जास्त मागणी असते. पण या वर्षी आंबा पीक थ्रीप्समुळे (Thrips) धोक्यात येण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यात थंडीमुळे आंब्याला चांगला मोहोर आला. पण या मोहोरासोबत ‘थ्रिप्स’चा देखील खूप प्रादुर्भाव वाढला.
याच पार्श्वभूमीवर बागायतदारांनी कीटकनाशकांच्या फवारण्या सुरू केल्या. तरीही प्रादुर्भाव कमी झाला नाही. याउलट तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रादुर्भाव जास्त होत असल्याने आता मोहर पूर्ण काळा पडत आहे. देवगड तालुक्यात या किडीचे प्रमाण जास्त आहे. यामुळे यंदा या भागातील उत्पादन बागायतदारांच्या हातातून जाण्याची शक्यता आहे.
बागायतदारांसमोर मोठं संकट
यंदा आंब्याला पहिल्या टप्प्यात १५ ते २० टक्के, दुसऱ्या टप्प्यात २० ते २५ टक्के, तर तिसऱ्या टप्प्यात ४० ते ५० टक्के मोहर आला. हाच मोहर किडीचा बळी ठरत आहे. असे झाल्याने यंदा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. कोणत्याही कीटकनाशकांची थ्रिप्स नियंत्रणात येत नसल्याने यावर नेमका कोणता उपाय करावा, हे बागायतदारांना सुचत नाही.
Biological Pesticides । आता शेतीचा खर्च होईल खूपच कमी, घरच्या घरीच तयार करा ‘हे’ जैविक कीटकनाशक
येत्या काही दिवसात उन्हाची तीव्रता आणखी वाढू शकते. यामुळे वाढत्या उष्णतेचा मोठा फटका हापूस आंब्याला बसू शकतो. त्यामुळे आंबा बागायतदार शेतकऱ्यांपुढे नवं संकट उभं राहिले आहे. यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठा फटका बसणार आहे. बागांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्या बागांचा परिणाम आजूबाजूच्या बागांवर होत आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.