Maharashtra Rain Update । गणपती बाप्पाचे आगमन झाल्यापासून राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असल्याचे दिसत आहे. अनेक दिवस ओढ दिलेल्या पावसाला सुरुवात झाल्यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. मात्र आता बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असला तरी पावसामुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथील जानेफळ या ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
काही ठिकाणी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असले तरी काही ठिकाणी पावसामुळे पिकांना नवीन जीवन मिळाले आहे, अनेक ठिकाणी पाण्याअभावी पिके करपू लागली होती अशा पिकांना नवसंजीवनी मिळाली असून ती पिके आता तरारली आहेत. पावसाचे जवळपास साडेतीन महिने उलटले असून मागच्या दीड महिन्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले आहे. (Maharashtra Rain Update)
मागच्या दोन दिवसापासून कोकणातील रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नगर, सोलापूर, पुणे, सांगली, मराठवाड्यातील जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड, बुलढाणा, अमरावती, वाशिम, अकोला, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे.
सोलापूर जिल्ह्यात देखील मागच्या अनेक दिवसापासून पावसाने ओढ दिली होती. मात्र प्रदीर्घ विश्रांती घेतल्यानंतर गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने या ठिकाणी हजेरी लावली. यामध्ये प्रामुख्याने माळशिरस, सांगोला, माढा, पंढरपूर, करमाळा तालुक्यात पाऊस चांगला झाला आहे तर मोहोळ, बार्शी, उत्तर सोलापूर दक्षिण आणि सोलापूर तालुक्यात पावसाने तुरळक हजेरी लावली आहे.
Soybean Rate । सोयाबीनचे भाव वाढले का? पाहा बाजारातील स्थिती
बऱ्याच ठिकाणी धो-धो पाऊस पडला यामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे देखील नुकसान झाले आहे. नदी, नाल्यांना पूर आले आहेत. या पावसाचा खरिपातील वाळलेल्या पिकांना फायदा होणार नाही मात्र रब्बीच्या पेरणीसाठी याचा उपयोग होऊ शकेल.
Udid Rate । उडदाला आज किती दर मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर