Madhura Jwari । राज्यात मोठ्या प्रमाणावर ज्वारीची लागवड (Cultivation of Jwari) करण्यात येते. ज्वारी काढणीनंतर चारा म्हणून वैरण जनावरांना खाण्यास घालतात. त्यामुळे ज्वारी (Jwari) हे पीक खूप फायदेशीर आहे. दरम्यान, ज्वारीच्या अनेक जाती आहेत. भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी तुम्ही चांगल्या जातीची निवड करू शकता. राज्यात ज्वारीची पेरणी पूर्ण झाली असून लवकरच तिची काढणी सुरु होईल.
Fish Food । तांदूळ माशांना खायला देता येते का? जाणून घ्या माशांच्या अन्नाबद्दल सविस्तर माहिती
‘मधुरा-1’ वाणाची ज्वारी
तुम्ही कधी ज्वारीपासून गूळ आणि काकवी तयार होते, असे ऐकले आहे का? होय, आता हे शक्य आहे. ज्वारीची अशी एक जात आहे, जिच्यापासून गूळ आणि काकवी तयार करता येणार आहे. ज्वारीची ही ‘मधुरा-1’ (Madhura 1) ही जात आहे. तिच्यापासून गूळ आणि काकवी तयार करता येते. इतकेच नाही तर या जातीपासून चांगल्या प्रतीचे ज्वारीचे धान्य, मूरघास आणि जनावरांना पौष्टिक चारा उत्पादित करता येतो. (Madhura 1 Jwari)
महत्त्वाची बाब म्हणजे निंबकर कृषि संशोधन संस्थेकडून हे गोड ज्वारीच्या धाटापासून काकवी आणि गूळ तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. (Cultivation of Madhura 1 Jwari) नव्वदच्या दशकानंतर या संस्थेने हळूहळू काही महत्त्वाचे बदल केले. त्यांनी ज्वारीच्या मधुरा-2 व मधुरा-3 हे नवीन दोन ज्वारीचे वाण विकसित केले आहेत.
जाणून घ्या वैशिष्टय
‘मधुरा 1’ ही ज्वारी सरासरी 120 दिवसांत काढणीला येते. ती खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामांत लागवड करता येते. खरीप आणि उन्हाळी हंगामात या जातीच्या ज्वारीपासून शेतकऱ्यांना धाटांचे जास्त उत्पादन मिळते. रब्बी हंगामात जास्त धान्य उत्पादन या जातीपासून मिळवता येते आणि या जातीच्या धाटांपासून तुम्ही काकवी तयार करू शकता.
Leopard Attack । आईवडील ऊस तोडण्यात रमले, बिबट्याने चिमुरडीवर केला हल्ला; पोटचा गोळा डोळ्यादेखत गेला
या ज्वारीचा चारा दुधाळ जनावरांसाठी खूप पौष्टिक मानण्यात येतो. या जातीच्या ज्वारीच्या चाऱ्यामुळे दूध उत्पादनात २० टक्क्यांची वाढ होते. या जातीच्या ज्वारीच्या काकवीमध्ये प्रथिने, कॅल्शियम, क जीवनसत्व आणि निकोटिनिक आम्ल (बी-3 जीवनसत्व) जास्त प्रमाणात आढळतात. हे लक्षात घ्या की एका हेक्टर क्षेत्रात या ज्वारीची पेरणी केली तर त्यापासून मिळणाऱ्या ज्वारीच्या धाटापासून एका हंगामात हेक्टरी 1000 ते 1200 लीटर मद्यार्काचे उत्पादन मिळते.