LPG Price 1 August । ब्रेकिंग! एलपीजी सिलेंडर महागला, बजेटनंतर दर वाढले

बातम्या
LPG Price 1 August

LPG Price 1 August । 1 ऑगस्टपासून दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 6.50 रुपयांनी वाढून 1652.5 रुपये झाली आहे. जुलैमध्ये या सिलेंडरची किंमत 1646 रुपये होती. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही आणि तो फक्त 803 रुपयांना उपलब्ध आहे. 10 किलो कंपोझिट एलपीजी सिलेंडरची किंमत 574.5 रुपये आहे.

Success Story । नादच खुळा! एकेकाळी दिवसाला 5 रुपये कमवणारा तरुण पोल्ट्री व्यवसायातून आज दिवसाला कमावतोय 60,000 रुपये

अर्थसंकल्पानंतर एलपीजी सिलिंडरचे दर वाढले आहेत दिल्ली ते पाटणा आणि चेन्नईपर्यंत 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. देशभरात ही वाढ आजपासून लागू करण्यात आली आहे. NDA सरकारने पहिल्या अर्थसंकल्पानंतर सर्वसामान्य नागरिकांना सिलेंडरच्या किमती वाढवून मोठा धक्का दिलाय.

Amul Price Hike । मोठी बातमी! अमूल दूध महाग, लिटरमागे २ रुपयांनी वाढ; सोमवारपासून नवे दर लागू

मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 7 रुपयांनी वाढून 1605 रुपये झाली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत फक्त 802.50 रुपये आहे. चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1817 रुपये झाली आहे, जी पूर्वी 1809.50 रुपये होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *