LPG Cylinder Price । आजकाल प्रत्येक घरी स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलिंडर वापरतात. या गॅस सिलिंडरच्या दरात कायम चढ-उतार होत असतात. त्यामुळे ग्राहक कायम चिंतेत असतात. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला LPG गॅस सिलिंडरच्या किंमती जाहीर करतात. आजसुद्धा इंधन कंपन्यांकडून व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचे दर जाहीर करण्यात आले आहेत. तेल वितरण कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. दरवाढीनंतर 19 किलोचा सिलेंडर 209 रुपयांनी महागला आहे.
Havaman Andaj । मोठी बातमी! राज्यात दोन दिवस मुसळधार पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल झाला का?
ही दरवाढ फक्त व्यवसायिक सिलेंडरमागे करण्यात आली आहे. मात्र, घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. केंद्र सरकारने मागच्या महिन्यापूर्वीच घरगुती गॅस सिलेंडरमध्ये २०० रुपयांनी कपात केली मोठी. यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला होता. यानंतर आता 1 ऑक्टोबर रोजी घरगुती एलपीजीच्या किमतींत कोणतेच बदल करण्यात आलेले नाहीत. आज फक्त व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींत बदल केले आहेत.
माहितीनुसार, 209 रुपयांच्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक सिलेंडरसाठी आता 1,731.50 रुपयांना मिळणार आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये 19 किलो व्यावसायिक सिलेंडर 1684 रुपयांना मिळणार आहार. दरम्यान, यापूर्वी 1 सप्टेंबरपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 157 कमी करण्यात आल्या होत्या मात्र सध्या त्यामध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
Onion Rate । कांद्याचे दर वाढले? जाणून घ्या बाजारातील परिस्थिती