LPG Cylinder । सर्वसामान्यांना निवडणुकीची भेट, आजपासून एलपीजी सिलिंडरचे दर इतक्या रुपयांनी झाले कमी

बातम्या
LPG Cylinder

LPG Cylinder । लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) मतदानाचा टप्पा सुरू होण्यापूर्वीच सर्वसामान्यांना आजपासून मोठी भेट मिळाली आहे. सरकारी तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी आज 1 एप्रिलपासून एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळेल आणि महागाई कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

Paddy Compensation । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! खात्यात येणार २५ लाख रुपये

व्यावसायिक सिलिंडरवर कपात लागू

सरकारी तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून देशातील विविध शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 30.50 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. मात्र, या कपातीचा लाभ केवळ 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवरच मिळणार आहे. घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत यावेळी कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Paddy Compensation । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! खात्यात येणार २५ लाख रुपये

आजपासून विविध शहरांमध्ये या किमती

ताज्या कपातीनंतर दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1,764.50 रुपयांवर आली आहे. त्याचप्रमाणे कोलकातामध्ये आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1,879 रुपयांना उपलब्ध होणार आहेत. या मोठ्या सिलिंडरसाठी मुंबईतील लोकांना आता 1,717.50 रुपये मोजावे लागतील, तर चेन्नईमध्ये त्याची किंमत आता 1,930 रुपये असेल.

Land Rule । आनंदाची बातमी! तुकडेबंदी कायद्यातील बदलामुळे १ ते ५ गुंठे जमिनीची करता येणार खरेदी-विक्री

व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीतील ही कपात महत्त्वाची ठरते कारण याच महिन्यात पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. सात टप्प्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुका या महिन्यात सुरू होणार असून जूनपर्यंत चालणार आहेत. यासोबतच सलग तीन महिन्यांपासून सुरू असलेली व्यावसायिक सिलिंडरची दरवाढही थांबवण्यात आली आहे.

Success story । पाटलांचा नादच खुळा! खडकाळ जमिनीत काढले तब्बल १२० टन उसाचे उत्पादन

दरम्यान, गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, महिला दिनानिमित्त (८ मार्च २०२४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची सूट जाहीर केली होती, तेव्हा घरगुती LPG सिलिंडर ग्राहकांना एक भेट मिळाली होती. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे ७ मार्चला मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या बाबतीत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाने 31 मार्च 2025 पर्यंत पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली होती.

Onion market । कांदा बाजार समितीतील धक्कादायक प्रकार! शेतकऱ्यांना व्यापाऱ्याने दिलेले लाखोंचे चेक झाले बाउन्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *