LPG Cylinder

LPG Cylinder । घरबसल्या Whatsapp वरुन बुक करा गॅस सिलेंडर, कसं ते जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

तंत्रज्ञान

LPG Cylinder । पूर्वी चुलीवर स्वयंपाक केला जायचा. परंतु त्याने प्रदूषण खूप होत होते. काळ बदलत गेला आणि आता सर्व स्वयंपाकघरात चुलीची जागा गॅस सिलेंडरने (Gas cylinder) घेतली आहे. काही मोजक्याच घरी तुम्हाला चूल दिसेल. गरज आणि मागणी पाहता गॅस सिलेंडरचे दर (Gas cylinder price) गगनाला भिडले आहेत. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलेंडरचे दर बदलत असतात.

Farmer strike । शेतकरी करणार 26 जानेवारीला देशभरात मोर्चा, नेमकं कारण काय?

गॅस सिलिंडरचे बुकिंग (Booking of gas cylinders) करणे, हे जरा कटकटीचे काम आहे. एलपीजी गॅस सिलिंडर बुक (LPG Gas Cylinder Booking) करण्यासाठी ग्राहकांना अनेक समस्या येतात. पण तुमची आता यातून सुटका होणार आहे. तुम्ही आता कोणत्याही त्रासाशिवाय एलपीजी गॅस सिलिंडर बुक करू शकता. त्यासाठी तुम्हाला कोठेही जाण्याची गरज पडणार नाही. तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे Whatsapp असावे लागते. (LPG gas cylinder booking by whatsapp)

Tur Market Price । तूर उत्पादकांसाठी खुशखबर! दर गेले 10 हजाराच्या घरात, जाणून घ्या

Whatsapp वरून करा सिलिंडर बुक

हल्ली सोशल मीडियाचा वापर जास्त झाला आहे. यामुळे जग अगदी मुठीत आले आहे. अनेकजण Whatsapp चा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. याच Whatsapp च्या मदतीने अनेक कामे चुटकीसरशी सहज पार पडत आहेत. तुम्ही आता Whatsapp च्या मदतीने एलपीजी गॅस सिलिंडर बुक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस कनेक्शनसोबत नोंदणीकृत क्रमांकावरून तुमच्या सेवा प्रदात्याला मेसेज करावा लागणार आहे.

Alu Cultivation । शेतकरी मित्रांनो अळूची लागवड करून तुम्हीही होऊ शकता श्रीमंत; जाणून घ्या लागवडीबद्दल कृषी तज्ञांची मोठी माहिती

तुम्ही Indane, HP आणि Bharatgas व्हॉट्सअ‍ॅपद्वारे गॅस सिलिंडर बुक करू शकता. तुम्ही इंडेन ग्राहक असाल तर तुम्हाला 7718955555 वर कॉल करून सिलिंडर बुक करता येईल. हे लक्षात घ्या की व्हॉट्सअॅपद्वारे बुकिंग करत असताना वापरकर्त्यांना त्यांच्या नोंदणीकृत नंबरवर REFILL किंवा 7588888824 टाइप करून संदेश पाठवावा लागेल, त्यानंतर त्यांना बुकिंगबद्दल माहिती मिळेल.

Onion Crop Management । कांद्यावरील सर्वात घातक रोगाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? अशाप्रकारे करा नियोजन नाहीतर होईल मोठे नुकसान

तुम्ही एसएमएसद्वारे बुकिंग करू शकता. तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC) मिळेल. HP गॅस वापरकर्ते – HP गॅस वापरकर्त्यांना त्यांचा नंबर 9222201122 सेव्ह करावा लागणार आहे. नंबरचा चॅट बॉक्स उघडून संदेश पाठवण्यासाठी BOOK लिहा.

Success Story । काकडीच्या लागवडीतून शेतकरी श्रीमंत, एक एकर काकडीतून मिळाले दोन लाख रुपये

असा करा व्हॉट्सअ‍ॅपवर गॅस सिलेंडर बूक

  • सर्वात अगोदर तुम्हाला नंबर सेव्ह करून HI लिहावे लागणार आहे पुढे भाषा निवडून येथून गॅस बुक, नवीन कनेक्शन, कोणतीही तक्रार असे सर्व काही करू शकता.
  • तुम्हाला स्क्रीनवर अनेक पर्याय दिसतील ज्यातून तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणताही पर्याय निवडू शकता.
  • गॅस रिफिल बुकिंग केल्यानंतर काही तासांनी एक नवीन सिलिंडर तुमच्याकडे पोहोच होईल.

Milk Subsidy । मोठी बातमी! अखेर दूध अनुदानाचा शासन जीआर आला, ‘या’ असतील अटी; वाचा संपूर्ण माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *