Leopard attacks

Leopard attacks । शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! बिबट्यांच्या हल्ल्यासंदर्भात वनमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश

बातम्या

Leopard attacks । अनेक संकटांचा सामना करत शेतकऱ्यांना शेती (Agriculture) करावी लागते. अनेकदा शेतकऱ्यांना रात्री देखील पिकांना पाणी द्यावे लागते. काही भागात बिबट्यांचा (Leopard) वावर जास्त असतो. या भागातील बिबटे शेतकऱ्यांवर सतत हल्ले (Leopard attacks in farmers) करतात. यामध्ये अनेक शेतकरी जखमी होतात तर काही शेतकरी मृत पावतात. यामुळे त्या शेतकऱ्यांचे कुटुंब उध्वस्त होते.

Eggs Rate । थंडी पडताच गगनाला भिडले अंड्याचे दर! प्रति नग ‘इतके’ मिळत आहेत दर

बिबट्यांचे प्रजनन नियंत्रित करा

आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्यांचा वावर वाढत चालला आहे. मोठ्या प्रमाणावर हल्ले या ठिकाणी होत आहेत. त्यामुळे या चार तालुक्यातील बिबट्यांची वाढती संख्या आणि हल्ले रोखण्यासाठी (Leopard attacks farmers) बिबट्यांचे प्रजनन नियंत्रित करावे. या तालुक्यात दिवसा थ्री फेज विजेचा पुरवठा करण्यात यावा, या मागणीला प्रतिसाद देत याबाबत तातडीने बैठक घेण्याचे निर्देश केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव (Bhupendra Yadav) आणि वनविभागाचे महासंचालक चंद्र प्रकाश गोयल (Chandra Prakash Goyal) यांनी दिल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी दिली आहे.

Sharad Pawar । मी कृषीमंत्री झाल्यावर पहिली फाईल… नेमकं काय म्हणाले शरद पवार?

बिबट्यांच्या संख्येत वाढ

महत्त्वाचे म्हणजे खेड, शिरूर, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यात बिबट्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मानवी वस्त्यांमध्ये पाळीव जनावरे आणि शेतकऱ्यांवर बिबटे सतत हल्ले करत आहेत. या हल्ल्यात अनेक लहान मुलांसह शेतकऱ्यांचा मृत्यू होत आहे. यावर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नाही. बिबटे पकडण्यासाठी पिंजरे पुरेसे नाही.

Onion Export । ब्रेकिंग! दोनच दिवसात घेणार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय, कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

त्यासाठी बिबट्यांचे प्रजनन नियंत्रण करण्याची खूप गरज आहे, असे मत डॉ. कोल्हे यांनी अनेक दिवसांपासून लोकसभेत उपस्थित केले होते. आता याच पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी भुपेंद्र यादव आणि चंद्र प्रकाश गोयल यांची भेट घेतली. त्यावेळी बिबट्यांच्या हल्ल्यासंदर्भात हे निर्देश दिले आहेत. वनमंत्र्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Milk Rate Issue । धक्कादायक! मंत्र्यांनीच केली दूध उत्पादकांची बदनामी

आर्थिक मदतीची गरज

तसेच विषारी सर्पदंशाने मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी कोल्हे यांनी केली आहे. साप चावणे आणि इतर विषारी प्राणी हे हल्ले बिबट्याच्या हल्ल्यांसारखेच गंभीर झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या किंवा कायमचे अपंग झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना बिबट्याच्या हल्ल्यांच्या निकषानुसार आर्थिक मदत दिली जावी, अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे.

Signs of identifying mange in animals । जनावरांतील माज ओळखण्याची लक्षणे कोणती? पशुपालकांनो वाचा फायद्याची माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *