Land Rule

Land Rule । तुमचाही शेतात जाणारा रस्ता अडवला आहे? काळजी करू नका, फक्त करा ‘हे’ काम

शेती कायदे

Land Rule । सतत जमिनीशी निगडित वाद (Disputes related to land) होत असतात. अनेकदा हे वाद खूप टोकाला जातात. जमिनीवरील अनेक खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. इतकेच नाही तर शेतजमिनीच्या बाबत अनेक नियम (Farmland Rules) आहेत. तुम्हाला हे नियम माहिती असावेत. जमीन बागायत करण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करतात, पण काहीजण शेतात जाणारा रस्ता अडवतात. अशावेळी काय करावे ते समजत नाही.

Success Story । स्वप्नाला मुरड घालून केली सीताफळ लागवड, लाखात होतेय कमाई

जर तुमच्याबाबतही असे घडले असेल तर काळजी करू नका. तुम्ही आता कायद्याची मदत घेऊन या समस्येवर मात मिळवू शकता. रस्ता, झाडे,शेती, माती, पाणी, नाला, कालवा, पाट, नदी, चराई जंगल यांच्याशी निगडीत ‘मामलेदार कोर्ट कायदा’ (Mamledar Courts Act 1906) आहे. याची मदत तुम्ही घेऊ शकता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अनेक शेतकऱ्यांना याची माहिती नाही.

Farmer March । महाविकास आघाडीच्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ला आजपासून सुरुवात, असणार ‘या’ महत्त्वाच्या मागण्या

ब्रिटिश काळात कायदा अस्तित्वात

मामलेदार न्यायालय अधिनियम हा 1906 मध्ये म्हणजे ब्रिटिश काळात कायदा अस्तित्वात आला आहे. त्याची व्याप्ती मुंबई शहर वगळून महाराष्ट्र राज्यात सगळीकडे आहे. शेती मुद्द्यांवरील न्यायदानाचे काम लवकरात लवकर व्हावे, यासाठी हा कायदा अस्तिवात आणला आहे. शेतकरी आता जमिनीचा वाद, वहिवाट रस्ता, पाण्याची अडवणूक, खंड, कुळ कायदा, संयुक्त जमिनीचे मालकी हक्कांवरून वाद यांसारख्या गोष्टींसाठी या कायद्याअंतर्गत थेट तहसिलदारांकडे दाद मागू शकतात.

Havaman Andaj । मोठी बातमी! राज्याला पुन्हा बसणार अवकाळीचा फटका, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

20 वर्षापेक्षा जास्त काळ वापरत असणारे रस्ते किवा कायदेशीर अस्तिवात असणारे रस्ते आणि हक्क यांच्या संरक्षणाचा समावेश या कायद्यात करण्यात आला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे समजून घ्या की यात नवीन रस्ता देण्याची तरतूद नाही. तालुका पातळीवर अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांना यात अधिकार प्राप्त झाले आहे.

Leopards Attack । ऊसतोड कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर, बिबट्याच्या वावराने भीतीचे वातावरण

असा करा अर्ज

  • ज्या तारखेपासून रस्ता किंवा पाणी अडवले असेल त्या तारखेपासून सहा महिन्याच्या आत दावा दाखल करा.
  • दावा एक विनंती अर्ज किंवा साधे पत्र / निवेदन लिहून करता येतो. यावर तहसीलदार किंवा नायब तहसीलदार कार्यवाही करतात.
  • विनंती पत्रात दिलेल्या मालमत्तेचे सविस्तर वर्णन करा.
  • अन्यायग्रस्त शेतकऱ्याला प्रतिज्ञापत्र द्यावे लागते.
  • समजा एखादी जमीन नुकतीच खरेदी केली असेल तर अशावेळी फेरफार, जमिनीचे नकाशे जोडा.

Crab farming । खेकड्याची शेती नेमकी कशी करावी? त्याच्या पद्धती कोणत्या? जाणून घ्या A to Z माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *