Land Rights

Land Rights । कामाची बातमी! बांधावरील जमिनीच्या वादावर निघाला मार्ग, मोजणीसाठी ‘हे’ यंत्र ठरतेय फायदेशीर

बातम्या

Land Rights । जमिनीची मोजणी (Land measurement) करायची म्हटलं की अर्ज द्या, जमिनीच्या मोजणीसाठी सरकारकडे ठराविक रक्कम भरा, सतत सरकारी अधिकाऱ्यांच्या हाता-पाया पडा, तरीदेखील शासकीय अधिकारी मोजणी लवकर करत नाहीत. मोजणीसाठी सतत सरकारी कार्यालयात (Government offices) हेलपाटे मारावे लागतात. शिवाय बांधावरील जमिनीवरून सतत वाद होतात. परंतु, यावर आता तोडगा निघाला आहे.

Havaman Andaj । येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

सध्या सॅटेलाइटद्वारे होणारी मोजणी (Land measurement satellite) खूप फायद्याची ठरत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात भूमी अभिलेख विभागात सॅटेलाइटशी जोडण्यात आलेल्या आधुनिक दोन रोव्हर मशीनच्या माध्यमातून जमिनीची मोजणी केली जात आहे. मशीनच्या मदतीने मागील ८ महिन्यांमध्ये १७८ पैकी १५७ शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी केली आहे.

Devendra Fadanvis । मोठी बातमी! … तर सरकार करणार कांद्याची खरेदी, फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

दरम्यान, जमीन मोजणी वेगाने आणि अचूक होण्यासाठी राज्याच्या जमाबंदी आयुक्तालयाकडून सॅटेलाइटच्या माध्यमातून जमिनीची मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने त्यासाठी लागणारी ८०० जमीन मोजणी यंत्रे खरेदी केली आहेत. एप्रिल २०२३ पासून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी या रोव्हर मशीनद्वारे सुरू झाली.

Kisan Exhibition । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 13 ते 17 डिसेंबरदरम्यान पुण्यात किसान प्रदर्शनाचे आयोजन

अशी होते मोजणी

सर्व्हे ऑफ इंडियाच्या (Survey of India) मदतीने मोजणी स्थानके उभारली जातात. त्यानुसार उपग्रहाच्या आधारे प्राप्त होणाऱ्या तरंग लहरीद्वारे मोजणी करायच्या ठिकाणांचे अक्षांश आणि रेखांश दर्शविले जाते. ही मोजणी रोव्हरमध्ये (Land measurement rover) साठवण्यात येते, त्यानंतर अक्षांश- रेखांशांवरून ऑटोकेंड संगणकप्रणालीचा वापर करून नकाशे तयार केले जातात. या मशीनने दहा एकर जमिनीची मोजणी अवघ्या अर्धा तासात पूर्ण होते.

Ethanol । इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्याने शेतकऱ्यांवर किती परिणाम होणार? जाणून घ्या

जाणून घ्या रोव्हरचा फायदा

  • जमीन मोजणीला वेग येतो.
  • जमीन मोजणीसाठी कमी मनुष्यबळ लागते.
  • ईटीएस मशिन, प्लेन टेबलवरील ताण कमी होतो.
  • मोजणीतील अचूकता आणि पारदर्शकता वाढते.

Property Rights । वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा किती हक्क? काय सांगतो कायदा? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *