Land Registry

Land Registry । कामाची बातमी! शनिवार-रविवारीही करता येणार जमिनीची खरेदी-विक्री, आठवडाभर सुरु राहणार कार्यालये

बातम्या

Land Registry । मागील काही वर्षांत जमिनीच्या किंमती खूप वाढल्या आहेत. अनेकजण जमिनीचे तुकडे करून त्यांची विक्री करतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अनेकांची जमीन खरेदी आणि विक्री करताना फसवणूक होत आहे. अलीकडच्या काळात हे प्रमाण खूप वाढले आहे. अनेकदा दोन भावांमध्ये किंवा बहिणींमध्ये जमिनीवरून खूप टोकाचे वाद होतात.

Modern Agricultural Machine । भारीच की राव! ‘या’ यंत्राच्या मदतीने काही तासात होते गव्हाची कापणी, किंमतही आहे खूपच कमी

आठवडाभर सुरु राहणार कार्यालये

जरी जमिनीच्या किमती (Land Price) खूप वाढल्या असल्या तरी आता अनेकजण जमीन खरेदी (Land Buying and Selling) करू लागले आहेत. परंतु, शनिवार-रविवारी सर्वसामान्यांना जमिनीशी निगडित व्यवहार करता येत नव्हते. याच संदर्भात एक मोठी बातमी आहे. तुम्ही आता आठवड्यातील कोणत्याही दिवशी जमिनीची खरेदी किंवा विक्री करू शकता. कारण संपूर्ण आठवडाभर उपनिबंधक कार्यालय सुरू राहणार आहेत.

Dairy Business । मोठी बातमी! दूध संस्थांमधील वजन काटा रद्द होण्याची शक्यता

महसूलमंत्र्यांनी दिली माहिती

याबाबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील काही ठिकाणी हा प्रयोग सुरू केला आहे. सर्वसामान्य नागरिकांना सोमवार ते शुक्रवार पर्यंत नोकरीसाठी जावे लागते. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आता राज्यात लवकरच शनिवार आणि रविवारी उपनिबंधक कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय होईल. सर्व सरकारी कामे एकाच छताखाली आणण्याचे नियोजन सध्या सुरु आहे.

Havaman Andaj । सावधान! पुढचे तीन दिवस ‘या’ भागाला बसणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा

जर हा निर्णय लागू झाला तर सर्वसामान्य नागरिकांना उपनिबंधक कार्यालयाचे जास्त हेलपाटे मारावे लागणार नाहीत. जमीन खरेदी- विक्रीच्या कामामध्ये नागरिकांची सोय व्हावी. तसेच त्यात सुसूत्रता यावी यासाठी लवकरच एक महत्वाचा निर्णय घेतला जाईल. अहमदनगर शहरात नवीन महसूल इमारतीचे भूमिपूजन राधाकृष्ण विखे यांनी केले त्यावेळी ते बोलत होते.

Navratri 2023 । काय आहे शेतीच्या दृष्टीनं घटस्थापनेचं महत्व? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *