Land Measurement

Land Measurement । जमीन मोजणीसाठी किती खर्च येतो? अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

बातम्या

Land Measurement । आपल्या सातबाऱ्यावर जेवढी जमीन नमूद केली आहे तेवढी जमीन प्रत्यक्ष दिसत नाही, असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असतो. अशावेळी शेजारच्या शेतकऱ्याने आपल्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे की काय? असादेखील प्रश्न पडतो. परंतु या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर तुम्ही जमिनीची मोजणी करू शकता. जमीन मोजणीसाठी किती खर्च येतो? अर्ज कसा करावा? याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Milk Price । ऐन सणासुदीत पशुपालकांचं गणित बिघडलं! दुधाच्या किमती कमी आणि चारा महागला

असा करा अर्ज

  • तुम्ही bhumiabhilekh.maharashtra.gov.in या वेबसाईटवर अर्ज (Land Survey) करू शकता.
  • या अर्जात सुरुवातीला ज्या तालुक्यातील कार्यालयामध्ये हा अर्ज सादर करायचा आहे त्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचे नाव त्या ठिकाणी नमूद करावे लागते.
  • यातील पहिल्या पर्यायापुढे अर्जदाराच्या संपूर्ण नाव आणि पत्ता याविषयी संपूर्ण माहिती द्यायची आहे. गाव तसेच तालुका आणि जिल्ह्याचे नाव लिहायच आहे.
  • मोजणी करण्यासंबंधीची माहिती आणि मोजणी प्रकाराचा तपशील हा दुसरा पर्याय असून त्यातील मोजणीच्या प्रकारासमोर मोजणीचा कालावधी आणि उद्देश लिहावा लागेल.
  • पुढे तालुक्याचे नाव, गावाचे नाव आणि ज्या जमिनीची मोजणी करायची आहे त्या जमिनीचा गट क्रमांक टाकावा लागेल.
  • आता तिसऱ्या पर्यायात सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी फीची रक्कम भरा. त्यासाठी तुम्हाला चलन पावतीचा क्रमांक आणि तारीख टाकावी लागेल.

Havaman Andaj । राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता, तापमान घटल्याने अवकाळीचे संकट टळणार

या ठिकाणी करा तक्रार

समजा तुम्हाला हद्दीबाबत शंका असेल तर तुम्ही भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उप-अधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करू शकता.

Baramati Doodh Sangh । बारामती दूध संघाने दिलेल्या बोनसमुळे शेतकरी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

मोजणी प्रकार

जमीन मोजणीचे देखील प्रकार आहेत. तीन प्रकारे जमीन मोजणी करता येते. यात जमीन मोजणी किती दिवसात पाहिजे किंवा येईल हे ठरवले जाते. यातील पहिला प्रकार साधी मोजणी म्हणजेच ती 180 दिवसात करता येते. दुसरा प्रकार तातडीची मोजणी, जी कमीत कमी 80 दिवसात करता येते. तिसरी अति तातडीची मोजणी जी 60 दिवसात करता येते.

Onion Rate । बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला आज सर्वाधिक किती दर मिळाला? वाचा एका क्लिकवर

ई-मोजणी प्रणाली म्हणजे काय?

ऑफलाईन पद्धतीमध्ये शेतकऱ्याचा खूप वेळ जातो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचा भूमी अभिलेख विभाग ऑनलाईन पद्धतीनं जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया राबवत असून याला ई-मोजणी असे म्हणतात.

KVP Scheme । शेतकऱ्यांसाठी खास योजना! गुंतवणूक केल्यास मिळेल दुप्पट परतावा, जाणून घ्या

किती येतो खर्च?

जमीन मोजण्यासाठीचे क्षेत्र आणि जमीन मोजणी किती कालावधीत करून घ्यायची आहे यावरून जमीन मोजणीची फी ठरत असते. एक हेक्टर क्षेत्रावर साधी मोजणी करायची असल्यास एक हजार रुपये, तातडीची मोजणी करायची असल्यास दोन हजार रुपये खर्च येतो. तसेच अति तातडीच्या मोजणीसाठी 3000 रुपये खर्च (Land Measurement Price) येतो.

Dhananjay Munde । आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा! मिळणार संसार उपयोगी साहित्य किट

आवश्यक कागदपत्रे

  • शेजारील खातेदारांची नावे व पत्ते,9/3,9/4 चा नकाशा
  • विहित नमुन्यातील अर्ज फी कोर्ट फी स्टॅम्प
  • गाव नमुना सातबारा चा उतारा किंवा आखीव पत्रिकेचा उतारा
  • ज्या जमिनीची मोजणी करायची आहे तिचा अंदाजे नकाशा किंवा जमिनीच्या कोणत्या बाजू बाबत हद्दीची तक्रार कोणत्या बाजूची हद्दीत काय बदल करून पाहिजे याचा तपशील
  • मोजणीसाठीचे शुल्क भरण्याबाबतचे चलन

MS Dhoni । धोनीकडे आहे ‘या’ लोकप्रिय कंपनीचा ट्रॅक्टर, ज्यामुळे शेतीची कामे होतात सोपी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *