Land Law

Land Law । कायद्यानुसार एका व्यक्तीच्या नावावर किती जमीन असते? जाणून घ्या महत्त्वाचा नियम

शेती कायदे

Land Law । भारतात अजूनही जमीन हे गुंतवणुकीचे (Investment in Land) सर्वात लोकप्रिय साधन आहे. महत्त्वाचे म्हणजे हे फक्त गुंतवणूकच नाही तर अनेक समाजातील आर्थिक स्थिरता आणि स्थिती प्रतिबिंबित करत असते. त्यामुळे भारतातील (Land Law in India) खेड्यापाड्यात किंवा शहरांमध्ये सोन्याशिवाय जमिनीला खूप मान मिळत असतो. एक व्यक्ती किती शेतजमीन विकत घेऊ शकतो, असा अनेकांना प्रश्न पडत असतो. (Land Rules)

Weather Update । शेतकऱ्यांनो पिकाची काळजी घ्या, पुढील पाच दिवस थंडीची लाट आणि दाट धुक्याचा हवामान खात्याचा इशारा

सिलिंग कायदा

महाराष्ट्रात शेतजमिनीची कमाल मर्यादा ठरवून देणं, या मर्यादेपेक्षा जास्त जमीन एखाद्याकडे असल्यास ती संपादित करून भूमिहीन आणि इतर व्यक्तींना वाटप करणं, यासाठी राज्यात महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 हा कायदा अस्तित्वात आला आहे. यालाच सिलिंग कायदा (Ceiling Act) असं म्हणतात. या कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-2 या भूधारणा पद्धतीत मोडल्या जातात. (Land Acquisition Rule)

Tur Market । नवीन तुरीची आवक वाढल्यानंतर भाव वाढतील का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

सरकारी परवानगीशिवाय अशा प्रकारच्या जमिनीचे हस्तांतरण केले जात नाही. या कायद्यानुसार एका व्यक्तीच्या नावे किती जमीन असावी याची मर्यादा ही निश्चित केली आहे. त्यानुसार कोरडवाहू जमिनीची मर्यादा 54 एकर तर बारामाही पाणीपुरवठा नसून वर्षातून एकदा खात्रीशीर पाणीपुरवठा असणाऱ्या जमिनीची मर्यादा 27 एकर आहे.

Gairan Lands । गायरान जमीन नावावर करता येते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

..तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागते

हंगामी बागायत भात शेतीची जमीन असेल तर 36 एकर जमीन आणि बारामाही पाणीपुरवठा बागायत जमिनीसाठी 18 एकर जमिनीची मालकी एका व्यक्तीकडे असते. तसेच या कायद्यानुसार मिळालेली जमीन एखाद्या औद्योगिक उपक्रमासाठी केव्हा कृषी तर प्रयोजनासाठी गरजेची असल्यास अनार्जित प्राप्तीच्या 75 टक्के रक्कम देऊ केली तर जिल्हाधिकार्‍यांकडून या हस्तांतरणास परवानगी देता येते. या कायद्यानुसार जमीन हस्तांतरण करत असताना रक्कम अदा करण्यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते.

Dairy Business । मस्तच! आता सरकारी अनुदानावर सुरु करा डेअरी व्यवसाय, साडेचार लाखांपर्यंत मिळेल अनुदान; वाचा महत्वाची माहिती

विविध राज्यांचे विविध नियम

दरम्यान, जमिन खरेदीसाठी राज्यांचे विविध नियम आहेत. यातील काही राज्यांमध्ये यावर मर्यादा घालण्यात आली आहे. बिगरशेती जमिनीबाबत असा कोणताही नियम असल्याचे दिसत नाही. उदाहरणार्थ, आता हरियाणामध्ये तुम्ही कितीही बिगरशेतीयोग्य जमीन खरेदी करू शकता. तिथे कोणतेही बंधन नाही. पण इतर राज्यात वेगळे नियम आहे.

Success Story । प्रेरणादायी! मुलाने फेडले कष्टाचे पांग, मेहनतीच्या जोरावर झाला पीएसआय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *