Land Claims

Land Claims । आता घरबसल्या समजणार जमिनीचे दावे, फॉलो करा ही सोपी प्रोसेस

बातम्या शेती कायदे

Land Claims । सध्या जमिनीला सोन्याचे भाव आले आहेत. तरीदेखील अनेकजण जमिनी खरेदी करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता तुम्ही घरी बसून अवघ्या 5 मिनिटांत राज्याच्या सर्व भागांतील जमिनीचे सरकारी दर पाहू शकता. जमिनींची खरेदी करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण अलीकडच्या काळात जमीन खरेदी करताना मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहेत.

खरंतर जमिनी खरेदी करत असताना संबंधित जमिनींच्या दाव्यांची माहिती मिळत नाही. दस्तनोंदणी झाल्यानंतर त्या जमिनीसंदर्भात वाद सुरु असल्याची माहिती मिळते. त्यामुळे जमीन विकत घेणाऱ्यांच्या अडचणीत वाढ होते. खरेदी करणाऱ्याला देखील विनाकारण न्यायालयाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. परंतु आता तुमची जमीन खरेदी करत असताना फसवणूक होणार नाही.

जमीन खरेदी विक्री करत असताना वकिलांकडून संबंधित जमिनीचा शोध अहवाल घेण्यात येतो. परंतु बऱ्याचवेळा या अहवालात जमिनीबाबत न्यायालयीन वाद सुरू असल्याचे समजत नाही. त्यामुळे आता जमीन खरेदीदाराची फसवणूक होऊ नये यासाठी भूमी अभिलेख विभागाने महसूल आणि न्यायालयातील जमीनविषयक दाव्यांचा सर्वेक्षण क्रमांकनिहाय विदा तयार केली आहे.

तुम्हाला आता घरबसल्या अवघ्या पाच मिनिटात महसूल विभागात अथवा दिवाणी न्यायालयात दावा दाखल आहे की नाही, हे समजणार आहे. त्या संदर्भात भूमि अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर आणि ईक्‍युजेसी या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे तुमची जमीन खरेदी करत असताना कोणतीही फसवणूक होणार नाही.

फॉलो करा ही सोपी प्रोसेस

सर्वात अगोदर तुम्हाला भूमि अभिलेख विभाग आणि ईक्‍युजेसी या संकेतस्थळावर जावे लागेल. त्या ठिकाणी विभाग, जिल्हा, तालुका, गाव निवडावे लागेल. आता तुमचे गाव निवडल्यानंतर सर्व्हे नंबर टाकल्यानंतर त्या जमिनीसंबधित दावे सुरू आहेत की नाही, याची तुम्हाला माहिती मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *