Kisan Exhibition

Kisan Exhibition । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 13 ते 17 डिसेंबरदरम्यान पुण्यात किसान प्रदर्शनाचे आयोजन

बातम्या

Kisan Exhibition । बदलत्या काळानुसार शेतीत आता बदल होऊ लागले आहेत. शेतकरी आता पारंपरिक पद्धतीने नाही तर आधुनिक पद्धतीने (Modern Agriculture) पिके घेऊ लागले आहेत. आधुनिक पिकांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. तसेच शेतीशी निगडित कामे सोयीस्कर व्हावीत यासाठी अनेक यंत्रे (Agriculture machines) बाजारात दाखल होऊ लागली आहेत. शिवाय केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना (Government Schemes) सुरु करतात.

Ethanol । इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्याने शेतकऱ्यांवर किती परिणाम होणार? जाणून घ्या

13 ते 17 डिसेंबरदरम्यान देता येणार भेट

अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे शहरात (Pune) किसान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 13 ते 17 डिसेंबरदरम्यान हे प्रदर्शन सर्व शेतकऱ्यांसाठी खुले असणार आहे. शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रात झालेले बदल समजत नाही, यासाठी प्रदर्शन (Kisan Exhibition in Pune) आयोजित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर मागील अनेक वर्षांपासून ‘किसान’कडून (Kisan) प्रदर्शनाचे आयोजन केले जाते.

Property Rights । वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा किती हक्क? काय सांगतो कायदा? जाणून घ्या

या ठिकाणी केले आयोजित

पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्र, मोशी (International Exhibition in Pune Moshi) येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना जगातील नवनवीन आणि वेगवेगळे तंत्रज्ञान, निर्यात व्यवस्था, मानवरहित शेती तंत्रज्ञान, शेती क्षेत्रातील प्रक्रिया उद्योग, नवे यंत्र, शेतीपूरक व्यवसाय, विपणन व्यवस्था, शेतकऱ्यांनी केलेले प्रयोग पाहण्याची आणि खते, बियाणे, किटकनाशके, शेती निविष्ठा कंपनीच्या थेट महत्त्वाच्या व्यक्तींशी बोलण्याची संधी मिळणार आहे. विविध वस्तू खरेदी करता येतील.

Havaman Andaj । विदर्भासह कोकणात पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान अंदाज….

कृषी क्षेत्रातील संस्था होणार सहभागी

भरपूर माहिती मिळत असल्याने प्रत्येक वर्षी होणाऱ्या या प्रदर्शनाला लाखो शेतकरी आणि नागरिक भेट देतात. तसेच देशभरातील आणि जगभरातील शेती क्षेत्रांत काम करणाऱ्या महत्त्वाच्या संस्था देखील प्रदर्शनात सहभागी होतात. या संस्था त्यांचे उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करतात. शेतकऱ्यांना आणि नागरिकांना या संस्था त्यांनी तयार केलेल्या यंत्राचे, प्रयोगाचे प्रात्यक्षिक दाखवतात.

Onion Rate । शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी! जानेवारीपर्यंत कांद्याचे भाव उतरणार

त्यामुळे हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरते. यावर्षी देखील हे प्रदर्शन पाहण्याची संधी शेतकऱ्यांना मिळत आहे. येथे अनेक शेतकऱ्यांच्या, त्यांच्या प्रयोगाच्या ओळखी होतात. भारतातील हे सर्वात मोठे कृषी प्रदर्शन असणार आहे. भविष्यात येऊ घातलेल्या डिजीटल अॅग्रिकल्चरसाठी हे प्रदर्शन खूप महत्त्वाचे असणार आहे, यात काही शंकाच नाही.

Encroachment land । जमिनीवर अतिक्रमण केल्यास घाबरू नका, ‘या’ ठिकाणी करा दावा, टळेल अतिक्रमण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *