Kharif Season । देशासह राज्यात यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवली आहे. पावसाअभावी शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाऊस नसल्याने पिके जळून गेली आहेत. विहिरींनी देखील तळ गाठला आहे. राज्य सध्या दुष्काळाचा सामना करत आहे. शेतकरीवर्ग कमालीचा निराश झाला आहे. (Agriculture News)
महसुली ६७८ पैकी साडेचारशे ते पाचशे गावांत कमी पाऊस झाला आहे. सरकारतर्फे पैसेवारी (Kharif Paisewari) जाहीर करण्यास विलंब होत आहे. तसेच दुष्काळाची देखील घोषणा केली जात नाही. रब्बी हंगामाची खात्री नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच सरकारकडून ई-पीक पाहणीला मुदतवाढ देण्यात आली आहे.
तालुकानिहाय सर्वात जास्त साक्रीत ६१ हजार ३५, धुळे ५६ हजार १४९, शिंदखेडा ५५ हजार, शिरपूर तालुक्यात ३५ हजार २३ शेतकऱ्यांनी ई-पीक पेरा नोंदणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण दोन लाख सात हजार २०२७ शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी केली आहे. २०२३- २०२४ हंगामातील पिकांची शंभर टक्के नोंदणीसाठी यंत्रणेतर्फे विशेष अभियान राबवले होते.