Jowar Market

Jowar Market । ज्वारीच्या दरात खूप मोठी घसरण, जाणून घ्या नवीनतम दर

बाजारभाव

Jowar Market । यंदा पावसामुळे सर्वच शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. वेळेत पाऊस न पडल्याने  अनेक पिके (Rain in Maharashtra) जळून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. कमी उत्पादनामुळे धान्यांचे दर (Crop Price) वाढले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ज्वारी हे मुख्य पीक आहे. येथे ज्वारीचे (Jowar) विक्रमी उत्पादन घेण्यात येते. त्यापाठोपाठ मराठवाड्यात उत्पादन घेतले जाते. (Jowar Bajar Bhav)

Success Story । शेतकऱ्याचा नाद नाही! स्ट्रॉबेरीतून मिळवलं लाखोंचं उत्पन्न, असं केलं नियोजन

पेरणीचा टक्का वाढला

दरम्यान, मागील वर्षी कमी पाऊस झाला होता, त्यामुळे रब्बीचे क्षेत्र नापेर राहण्याची दाट शक्यता होती. पण नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसानंतर या दोन जिल्ह्यांत रब्बी ज्वारीच्या पेरणीचा टक्का वाढला आहे. परभणी जिल्ह्यामध्ये शुक्रवारअखेर ८६ हजार ५०५ हेक्टरवर आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये १६ हजार ८९९ हेक्टरवर ज्वारीची पेरणी पूर्ण झाली आहे.

Onion Exprot Ban । धक्कादायक! कांद्यामुळे रखडली शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने, नेमकं प्रकरण काय?

ज्वारीच्या पेरणीची टक्केवारी वाढली असल्याने ज्वारीच्या दरात घसरण (Jowar rate) सुरू झाली आहे. परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ज्वारीचे दर खूप कमी झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी हेच दर प्रतिक्विंटल साडेचार ते पाच हजार रुपयांवर गेले होते. पण मागील काही आठवड्यापासून ज्वारीचे दर अडीच हजार रुपयांपर्यंत कमी झाले आहेत.

PM Kisan Yojana । वडील आणि मुलालाही घेता येणार PM किसान योजनेचा लाभ? काय सांगतो नियम? जाणून घ्या

शेतकरी हवालदिल

बाजारभावाचा विचार केला तर, परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी ज्वारीची ४७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ३००० ते कमाल ३५०० रुपये तर सरासरी ३३०० रुपये दर मिळाले. गुरुवारी ज्वारीची ३५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ३००० ते कमाल ३८५० रुपये तर सरासरी ३६५० रुपये दर मिळाले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Havaman Andaj । येत्या 24 तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता, महाराष्ट्रासह अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ज्वारीच्या बाजारभावात वर्षभरात सर्वात मोठी वाढ झाली होती. पण आता पुन्हा हे दर कमी झाले आहेत. जर येत्या काळात ज्वारीचे दर आणखी कमी होऊ शकतात. यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा तोटा होईल. आता हे दर आणखी कमी होणार की आणखी वाढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Success Story । नाद नाही करायचा..1 एकर आल्यातून शेतकऱ्याने कमावले 10 लाख रुपये; जाणून घ्या कसं केलं नियोजन?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *