Jivamrit preparation

Jivamrit preparation । शेतकरी बांधवांनो! घरबसल्या २ मिनिटात तयार करा जीवामृत, जाणून घ्या पद्धत

कृषी सल्ला

Jivamrit preparation । भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतात अनेक पिकांचे उत्पादन घेण्यात येते. शेतकरी आता पारंपरिक पिकाला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळाले आहेत. जर तुम्हाला शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला शेतीत खूप मेहनत करावी लागते. परंतु हल्ली शेतीशी निगडित सर्व गोष्टी महाग झाल्या आहेत. शेतकऱ्यांना जास्त पैसे खर्च करून वस्तू खर्च कराव्या लागत आहेत.

Success story । शेतकऱ्याची बातच न्यारी! ‘या’ देशातून इंम्पोर्ट केलं बाजरीचं बियाणं, आली 3 फुटाची कणसे

प्रामुख्याने रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे रासायनिक खतांना पर्याय म्हणून शेतकरी सेंद्रिय खतांकडे वळू लागले आहेत. तुम्ही आता घरच्या घरीच जीवामृत तयार करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही. तुम्ही कमी किमतीत हे तयार करू शकता. यासाठी कोणत्या वस्तू लागतात? जाणून घेऊयात.

Gold Fish Farming । ‘सुवर्ण’ कमाई करून देणारा व्यवसाय, कमी खर्चात घरबसल्या अशी करा सुरुवात

आवश्यक गोष्टी

  • शेण – 5 किलो
  • गोमूत्र – 10 लिटर
  • बेसन (कोणत्याही डाळीतून) – 2 किलो
  • गूळ – 3 किलो

Havaman Andaj । तापमानात घट झाल्याने थंडीची चाहूल, ‘या’ ठिकाणी कोसळणार जोरदार पाऊस

अशाप्रकारे तयार करा जीवामृत

सर्वात अगोदर गोमूत्र एका डब्यात ठेवून त्यामध्ये 5 किलो शेण घालावे. हे लक्षात घ्या की हे मिश्रण तयार करताना त्यात कोणत्याही प्रकारची गुठळी राहणार नाही. दुसऱ्या भांड्यात ३ किलो गूळ पाण्यात विरघळवून घ्या. या गुळाची देखील गुठळी राहणार नाही, याची काळजी घ्या. विरघळलेला गूळ शेण असणाऱ्या गोमूत्रात मिसळा. हे दोन्ही मिश्रण ढवळून घेऊन त्यात 2 किलो बेसन घाला. हे मिश्रण काही वेळ ढवळावे. चांगल्या प्रकारे हे मिश्रण चांगले मिसळले की ते एका मोठ्या कंटेनरमध्ये टाकून त्यात काही वेळ काठीने ढवळत राहा. सर्वात शेवटी यात समान प्रमाणात पाणी घाला.

Agriculture News । फुलांनी सजल्या बाजारपेठा, किलोला मिळतोय विक्रमी दर

असा करा वापर

  • जमिनीत ओलावा असताना कडूनिंबाच्या डहाळीने पिकांच्या ओळीत हे जीवामृत शिपंडा.
  • कापूस, मिरची, केळी, पपई यांच्या खोडाजवळ डब्याने किंवा मगाने २५० ते ५०० मि.लि प्रतिझाड द्यावे.
  • तसेच तुम्ही ते पिकांना पाणी देताना मुख्य चारीमध्ये पाणी देणाऱ्या डब्याने बारीक धार लावून पाण्यासोबत सरीतून देऊ शकता.
  • महत्त्वाचे म्हणजे जिवामृताची निवळी फवारणीसाठी वापरतात.

Success story । यूट्यूबवर मिळाली प्रेरणा आणि वयोवृद्ध शेतकऱ्यानं केली ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती, कसे केलं नियोजन? पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *