Jaykwadi Dam Water । यंदा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हिवाळ्याच्या दिवसातच पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. अशातच मागील काही दिवसांपासून मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला होता. पाण्याचा वाद सुप्रीम कोर्टात गेला होता. यावर आता सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधून जायकवाडी धरणात (Jaykwadi Dam) ८.५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडले जाईल. मराठवाड्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऊन्हाळ्याच्या दिवसात निर्माण होऊ शकतो, अशी मनात भीती होती. परंतु आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटला आहे.
नेमका वाद काय?
दरम्यान, राज्य सरकारने उत्तर महाराष्ट्रातील धरणातील ८.५ टीएमसी पाणी जायकवाडी (Jaykwadi) धरणामध्ये सोडण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयाला स्थगिती मिळावी म्हणून जीवनी (टाकळी) सहकारी साखर कारखाना आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखाना यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. या सुनावणीदरम्यान, हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.
Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील २४ तासांत या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस
सर्वात महत्त्वाचे म्हणजे जायकवाडी धरणात अहमदनगर, नाशिक या दोन जिल्ह्यांतील धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध केला. जायकवाडी धरणाला उत्तर महाराष्ट्रातील धरणामधून पाणी दिले जाऊ नये, अशी त्यांची मागणी होती. या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी ठराव मंजूर केल्याने वाद न्यायालयात गेला होता.
Agriculture News । शेतकऱ्यांनो, करा ‘या’ औषधी वनस्पतीची शेती, तीन महिन्यात मिळतील तीन लाख रुपये
मराठवाड्याची भागणार तहान
परंतु, आता न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठवाड्याची (Marathwada) तहान भागेल. नारपार आणि दमणगंगा नद्यांच्या खोऱ्यांमधून गुजरातला पाणी घेऊन जाण्याचा केंद्र सरकारचा मेगा प्लॅन आहे. पण या नारपार योजनेला नागरिकांचा मोठा विरोध आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर राजकीय नेते काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Animal Husbandry । बापरे! तब्बल 11 कोटींची म्हैस, महिन्याला येतोय अडीच ते तीन लाखांचा खर्च