Jalyukta Shivar Yojana

Jalyukta Shivar Yojana । बळीराजासाठी आनंदाची बातमी! जलयुक्त शिवार 2.0 योजनेला गती मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

शासकीय योजना

Jalyukta Shivar Yojana । ऐन पावसाळ्याच्या दिवसात पावसाची अनियमितता आणि पावसातील खंडामुळे सतत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊन त्याचा शेतीवर मोठा परिणाम होतो. सिंचनाच्या मर्यादित सुविधा, अवर्षणप्रवण क्षेत्राची मोठी व्याप्ती, हलक्या जमिनीचे मोठे प्रमाण यामुळे कृषी क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्चितता या बाबी लक्षात घेता बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान (Government Schemes) सुरु करण्यात आले आहे.

Havaman Andaj । पुढील ३-४ तास महत्त्वाचे, राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळणार; या ठिकाणी गारपिटीचा इशारा

दरम्यान, आता जलयुक्त शिवार अभियान 1.0 प्रभावीपणे राबविल्यानंतर आता जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियान 2.0 (Jalyukta Shivar Yojana 2) राबवले जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठी घोषणा केली आहे. या अभियानाला गती मिळण्यासाठी राज्यात आता जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबवले जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

Rajma Cultivation । राजमा लागवड करून अल्पावधीत मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न, बाजारात आहे मोठी मागणी; जाणून घ्या लागवडीची पद्धत

सामंजस्य करार

यासाठी व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसमवेत सामंजस्य करार केला आहे. गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवारच्या कामासाठी मृद व जलसंधारण विभागातर्फे सामंजस्य करारावर सचिव सुनील चव्हाण आणि व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था केंद्राचे अध्यक्ष प्रसन्न प्रभू यांनी स्वाक्षरी केली आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्री श्री रवीशंकर आदी उपस्थित होते.

Tomato Rate । टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! टोमॅटोचे दर वाढले, मिळतोय इतका भाव

कोणती कामे पार पडणार?

या कराराद्वारे राज्यातील वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, पुणे, अहमदनगर, लातूर, बीड, बुलढाणा, नागपूर, यवतमाळ, वाशीम, सोलापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर,नंदुरबार, धुळे, जळगाव, ठाणे, पालघर आणि नाशिक अशा 24 जिल्ह्यातील एकूण 86 तालुक्यात जलयुक्त शिवाराची गाळ काढणार आहे. सिमेंट बंधारे बांधणे, जल स्त्रोतांचे खोलीकरण, नद्यांचे रुंदीकरण आणि शेत तळे कामे होणार आहेत.

Pakistan Inflation । पाकिस्तानमध्ये भयानक महागाई, एलपीजी गॅसची किंमत 3,000 रुपयांच्या पुढे, मैदा, चहा, तांदळाचे भाव गगनाला भिडले

या कामांसाठी तीन वर्षांचा कालावधी असणार आहे. या करारानुसार, राज्यात आता व्यक्ती विकास केंद्र हे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती पिकविणे, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, मनुष्यबळ विकास, सध्याची रसायने आणि खतांवर आधारित पारंपरिक शेती नैसर्गिक शेतीमध्ये बदलणे ही कामे कृषी विभागाशी समन्वयाने करणार आहे. कामांमुळे आता या गावांतील शेतकऱ्यांच्या जीवनात जलक्रांती होऊन शेतीसिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल.

Cultivation Of Ginger । एक हेक्टर जमिनीत 25 लाख रुपयांपर्यंत कमाई करा, बंपर नफ्यासाठी आल्याची लागवड सुरू करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *