Jalna News

Jalna News । धक्कादायक बातमी! शेतकऱ्याने तुरीच्या शेतामध्ये केली एक एकर गांजाची लागवड; पोलिसांनी छापा मारत केली मोठी कारवाई

बातम्या

Jalna News । आपल्याकडे गांजाची शेती करण्यासाठी परवानगी नाही जर कोणी गांजाची शेती करत असेल तर त्याच्यावर पोलीस कारवाई केली जाते. मात्र असे असले तरी देखील काही जण आपल्या शेतामध्ये गुपचूप पद्धतीने गांजाची लागवड करत असल्याचे दिसत आहे. सध्या देखील गांजाची लागवड केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात कल्याणी गावांमध्ये घडला आहे. (Jalna News)

Apple Farming । नादच खुळा! आठवी पास व्यक्तीने केली सफरचंदाची शेती; उच्चशिक्षित लोकांपेक्षा कमावतोय जास्त पैसे; जाणून घ्या कस केलं नियोजन?

भोकरदन तालुक्यातील कल्याणी गावच्या शिवारामध्ये गांजाची लागवड केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली आणि कोट्यावधी रुपयांची गांजाची झाड जप्त केली आहेत. यानंतर पोलिसांनी मजुरांकडून ही झाडे ट्रॅक्टर मध्ये भरली. या ठिकाणच्या एका शेतकऱ्याने तुरीच्या शेतामध्ये एक एकर गांजाची लागवड केली होती. या कारवाईमध्ये १० ते १२ फूट वाढलेली ५०० ते ६०० झाडे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा कोट्यावधींचा मुद्देमाल आहे.

Tar Kumpan Yojana Maharashtra 2023 । शेतीला तार कुंपण करण्यासाठी सरकार देतयं 90% अनुदान; असा करा अर्ज

गांजा शेती करण्याची परवानगी नसताना देखील ही शेती केल्याप्रकरणी शेतीमालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आला आणि या छाप्यामध्ये गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत.

Havaman Andaj । पुढील 24 तासांत ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा हवामान विभागाचा ताजा अंदाज

भारतात गांजावर बंदी

भारतामध्ये गांजा पिकवण्यावर पूर्णपणे बंदी आहे तरीदेखील काही लोक छुप्या पद्धतीने याची लागवड करत असल्याचे दिसत आहे. काहीजण याचा व्यापार देखील करतात. मात्र पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते. त्यामुळे कोणीही छुप्या पद्धतीने गांजाची शेती करू नये असे कायम आव्हान देखील करण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *