Irrigation Department

Irrigation Department । मोठी बातमी! पोटवितरिका फोडून पाणी सोडल्याने पवारांवर गुन्हा दाखल

बातम्या

Irrigation Department । निवडणुकांच्या तोंडावर (Election 2024) राज्यातील जनतेला सतत धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अशातच आता आणखी एक धक्का बसला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. पोटवितरिका फोडून पाणी सोडल्याने एका बड्या राजकीय नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Gram Rate । नवा हरभरा खातोय ‘इतका’ भाव, जाणून घ्या नवीनतम दर

भाजप नेत्या व प्रचार प्रमुख अमृता पवार (Amrita Pawar) यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाने पालखेड डाव्या कालव्याला सोडलेल्या आवर्तनातून शेतकऱ्यांना वितरिका क्रमांक २८ वरील पोटवितरिका फोडून पाणी सोडल्यामुळे पवार यांच्यावर पोलिस ठाण्यात तब्बल महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Narendra Modi | मोदी सरकार शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याच्या तयारीत, बड्या नेत्याच्या आरोपामुळे खळबळ

पोटवितरिका फोडल्याने गुन्हा दाखल

दरम्यान, याबाबत अधिक माहिती अशी की, अवर्षणप्रवण तालुका असल्याने पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनावर तालुक्यातील रब्बी हंगाम अवलंबून असून यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने या आवर्तनाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी रब्बीची पिके आणि कांदा लागवड केली आहे. त्यातच नोंदणी करूनही पाणी मिळत नव्हते त्यामुळे पाण्यासाठी विविध भागांतील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते.

Success Story । दाम्पत्याने मारली नोकरीवर लाथ, अनोख्या पद्धतीने शेळीपालन करून वर्षाला होतेय लाखोंची कमाई

पालखेड कालव्यावरील चारी क्रमांक २५ आणि २८ येथे शेतकऱ्यांवर पाणी देण्यास अन्याय होत होता, त्यामुळे चारी भाजपच्या अमृता पवार आणि समर्थकांनी फोडून शेतकऱ्यांना पाणी मिळावून दिले. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करून त्यांना अटक करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे, असे पवार समर्थकांनी म्हटले आहे.

Tur Market । तुरीला सध्या किती बाजारभाव मिळतोय? शेतकरी मित्रांनो वाचा एका क्लिकवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *