Intercropping in Sugarcane

Intercropping in Sugarcane । ऊसामध्ये आंतरपीक घेणे फायद्याचे की तोट्याचे? वाचा महत्वाची माहिती

बातम्या

Intercropping in Sugarcane । भारत हा असा देश आहे ज्यामध्ये दरवर्षी उसाची (Sugarcane) मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. भरघोस उत्पन्न देणारे पीक म्हणून उसाकडे (Cultivation of sugarcane) पाहिले जाते. उसाच्या विविध जाती आहेत, ज्यामुळे उसाचे उत्पन्न निघते. काही शेतकरी काही गुंठ्यांमध्ये भरघोस उत्पादन मिळवतात. शेतकरी अनेक समस्यांवर मात करत जास्त उत्पन्न मिळवतात.

Goat rearing । दूध दर झाले कमी, पशुपालकांचा वाढला शेळीपालनाकडे कल

काही शेतकरी दोन ओळीमधील अंतर जास्त असल्याने उसाच्या पिकामध्ये आंतरपीक (Sugarcane Intercropping) घेतात. शेतकरी मका, हरभरा, कांदा, गहू यांसारखी आंतरपीके घेताना आपल्याला पाहायला मिळतात. पण हे आंतरपीक (Intercropping) कितपत फायद्याचे आहे की ते तोट्याचे आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. काही शेतकरी आंतरपीके फायद्याचे असल्याचे सांगतात तर काहीजण याचे तोटे सांगतात.

Tree Plantation Scheme । धक्कादायक! अनुदान अपहारप्रकरणी न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश

शेतकरी कमी वेळेतील पीक घेऊन चांगला नफा कमावतात, खरंतर ९० दिवस ते १२० दिवसांतील पिके उसामध्ये आंतरपीक म्हणून फायद्याचे ठरते. पण जर तुम्हाला मूळ पिकावर लक्ष केंद्रीत करायचे असल्यास नक्कीच शेतकऱ्यांनी आंतरपीक घेताना थोडा विचार करावा. जर शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न मिळवायचे आहे अशा शेतकऱ्यांनी आंतरपीक घ्यावे.

Guar rate । मोठी बातमी! गवारीच्या दरात सर्वाधिक वाढ; पाहा किती मिळतोय दर?

जाणून घ्या फायदे

कांदा, गहू, गोबी, हरभरा, यांसारखी पिके तुम्ही आंतरपीक म्हणून लागवड करू शकता. हे पीक निघाल्यानंतर त्या पिकांचा उर्वरित भाग उसाच्या सरीत कुजवला तर त्याचे खत तयार होऊन मातीतील सेंद्रीय कर्ब वाढते. आंतरपिकामुळे पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन होत असल्याने विविध अन्नद्रव्ये विविध पिकांसाठी विभागून जाऊन मातीत अन्नद्रव्यांचा समतोल टिकतो.

Bullock Cart Race । बैलगाडाप्रेमींसाठी मोठी बातमी! गावागावांत रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार

जाणून घ्या तोटे

समजा तुम्ही मक्यासारखे पीक उसात लावली तर उसासाठी जे खत देण्यात येते, त्या खतांचे जास्त शोषण मका हे पीक करते असा दावा अनेक शेतकरी करताना दिसतात. मका कणसाच्या दाणे भरण्याच्या कालावधीत दुप्पटीने अन्नद्रव्ये शोषण करून उसाची वाढ खुंटते. कमी वेळेत जास्त पाला आणि वाढ होणाऱ्या पिकांची लागवड केली तर उसाच्या पानापर्यंत सुर्यप्रकाश पोहोचत नाही.

Sugarcane । चर्चा तर होणारच! महिलेने एकरी १५० टन उत्पादन घेत पटकावला राज्य पुरस्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *