Industrial Electricity

Industrial Electricity । मोठी बातमी! आता औद्योगिक वीज जोडणीच्या खर्चाचा भार उचलणार महावितरण

बातम्या

Industrial Electricity । शेतीसह अनेक कामात विजेची (Electricity) खूप गरज असते, विजेशिवाय अनेक कामे पूर्ण होऊच शकत नाही. ग्रामीण भागात सतत विजेची कमतरता जाणवत असते. अनेकदा वीज नसल्याने पिके जळून जातात. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट येते. समजा डीपी (Electricity DP) जळाला तर त्यांना खूप वाट पाहावी लागते. शिवाय वीज जोडणीचा देखील खूप खर्च येतो.

Grape rates । धक्कदायक! करपा रोगाचा प्रादुर्भावामुळे द्राक्ष उत्पादकांचे तब्बल ३०० कोटींचे नुकसान

येणार नाही वीज जोडणीचा खर्च

पण आता तुमची यातून सुटका होऊ शकते. कारण आता ग्राहकांना वीज जोडणीचा खर्च (Cost of electricity connection) येणार नाही. आता शेती सोडून कोणत्याही नवीन वीज जोडणीसाठी आता ग्राहकाना खर्च करावा लागणार नाही. कारण यापुढे वीज जोडणीचा सर्व खर्च महावितरण करणार आहे. ग्राहकांनी केवळ कोटेशनची रक्कम भरावी लागणार आहे,’’ अशी माहिती महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे (Sunil Pavde) यांनी दिली आहे.

Tractor Subsidy Scheme । ट्रॅक्टरसाठी मिळतंय 50 टक्के अनुदान? जाणून घ्या यामागचं सत्य, नाहीतर होईल फसवणूक

बारामती, केडगाव आणि सासवड विभागांतील सर्व औद्योगिक ग्राहकांना गतिमान वीज सेवा देण्यासाठी बारामती ऊर्जा भवन येथे महावितरणने स्वागत कक्ष स्थापन केला असून सुनील पावडे व बारामती औद्योगिक विकास संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार यांच्या हस्ते या कक्षाचे उद्‍घाटन केले. यावेळी अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, उद्योजकांतर्फे संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार, कार्यकारी अभियंते म्हसू मिसाळ व संजय सोनवलकर, उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनिल अवचट, खजिनदार ॲड. ए. एल. शेख आदी उपस्थित होते.

Advance Crop Insurance । ब्रेकिंग न्यूज! ‘या’ जिल्ह्यात २१४ कोटी ६२ लाख रुपयांचा अग्रिम विमा वाटप

यावेळी सुनील पावडे बोलताना म्हणाले की, ‘‘औद्योगिक ग्राहकांना सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळाव्यात आणि त्यांना छोट्या-मोठ्या कामांसाठी कार्यालयात येण्याची गरज भासू नये, यासाठी हा ‘स्वागत कक्ष’ काम करणार आहे. तसेच भार बदल, नवीन जोडणीची माहिती असो किंवा नावात बदल, वीजबिलाची तक्रार प्रत्येक बाबतीत हा कक्ष ग्राहकांना मदत करेल. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Intercropping in Sugarcane । ऊसामध्ये आंतरपीक घेणे फायद्याचे की तोट्याचे? वाचा महत्वाची माहिती

करावे लागेल हे काम

यासाठी उद्योजकांनी swagatcell_baramati@mahadiscom.in या ई-मेलवर किंवा ७८७५७६८०२७ व ७८७५७६८०५० या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला तर महावितरण स्वत:हून ग्राहकांना फोन करून किंवा जागेवर भेट देऊन पुढील कार्यवाहीसाठी मदत करेल.

Goat rearing । दूध दर झाले कमी, पशुपालकांचा वाढला शेळीपालनाकडे कल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *